Awaj India
Register
Breaking : bolt
सखोल वैद्यकीय ज्ञान घेऊन* *आदर्श डॉक्टर बना- डॉ. संजय डी. पाटील*कराडमध्ये पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ; कौस्तुभ गावडे यांना वाढता पाठिंबा*करवीर तालुक्यातील ठरावधारकांचा छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला भक्कम पाठिंबा*महायुतीच्या ऐतिहासिक विजयात राधानगरी- भुदरगडचा सिंहाचा वाटा असेल* सखोल वैद्यकीय ज्ञान घेऊन* *आदर्श डॉक्टर बना- डॉ. संजय डी. पाटील*शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी मी कटिबद्ध आहे- शिक्षकमित्र कौस्तुभ गावडेगारगोटी परिसरात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!*गोकुळला सरदार पटेल डेअरी फेडरेशनमध्ये घेऊन संपवण्याचा महायुतीचा अजेंडा; सतेज पाटील यांचा घणाघातकौस्तुभ गावडे यांना राजकीय, शिक्षक संघटना आणि शैक्षणिक संस्थांचा वाढता पाठिंबा!*दूध उत्पादकांनो भाकरी देणाऱ्या आनंदराव पाटील चुयेकरांना विसरणार काय?

जाहिरात

 

कशासाठी.... दुधासाठी

schedule21 Jul 20 person by visibility 1980 categoryसंपादकीय

    
कशासाठी.... दुधासाठी
 
आवाज इंडिया लाइव्ह न्यूज प्रतिनिधी
अनुराधा कदम
वेळ सोमवारी सकाळी साडेअकराची. कोल्हापुरात लॉकडाउनचा पहिलाच दिवस. रविवारी रात्री त्या माऊलीने तान्हुल्यासाठी दूध आणून ठेवलं. सोमवारी ते दूध तापवताना नासलं. आठ महिन्याचं बाळ दुधासाठी रडू लागल्यावर ती आई दूध आणण्यासाठी बाहेर पडली. मास्क, सॅनिटायझरसह सगळी काळजी तिने घेतली. दूध जीवनावश्यक घटकात येत असलं तरी सकाळी सहा ते नऊ ही वेळ दूध आणण्यासाठी दिली आहे. लेकराच्या दुधासाठी बाहेर पडलेली ती आई या वेळेच्या परीघाबाहेर होती. माऊली घरापासूनच्या पुढच्या चौकात येताच तिला पोलिसांनी अडवलं. बाळाला दूध आणायला आलेय असं सांगूनही तिला पुढे सोडलं नाही. दूध आदल्या दिवशी आणून ठेवायचं… नासणार हे गृहित धरून फ्रीजमध्ये ठेवायचं अशा पर्यायांची शिदोरी देऊन नकारघंटा वाजवत पोलिसांनी तिला माघारी धाडलं. हे सगळं त्या रस्त्यावर असलेला एक नागरीक घराच्या गच्चीतून पाहत होता. त्याच्याही घरी लहान मूल असल्याने त्याने मिल्कपावडरचे पाऊच खरेदी केले होते. त्यातले दोन पाऊच त्या भल्या माणसाने माऊलीकडे सोपवले आणि पर्याय केवळ सांगितला नाही तर तो तिला उपलब्ध करून दिला. बाळाच्या एक कप दुधासाठी माऊलीला नियमाच्या कात्रीत अडकवले. मग… दूध आंदोलनात हजारो लिटर दूधाचे पाट ओतणाऱ्या आंदोलकांसाठी रस्त्यावरच्या पोलिसांची शिट्टी का वाजली नाही… लॉकडाउन नियमाचे पारायण का केले गेले नाही. बुलढाण्यात आंदोलकांनी दुधाने आंघोळ केली. सांगलीत महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार ओतली गेली. कोल्हापुरात दुधाच्या टँकरचा नळ सोडण्यात आला. हे सगळं लॉकलाउनच्या दुसऱ्या दिवशी भर रस्त्यात सुरू होतं. मान्य शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे…पण इतकं मस्तीला येणाऱ्या आंदोलकांना बालसंकुलातील तान्हुल्यांची…वृद्धाश्रमातील ज्येष्ठांची…गेल्या चार महिन्यांपासून पाठीला चिकटलेल्या पोटाला चिमटा देत जगणाऱ्या गोरगरीबांची आठवण का झाली नाही…? आंदोलक हा संवेदनशील असावा लागतो… शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारा तर संवेदनशील असावाच… एकीकडे लेकराच्या दुधाची तहान भागवण्यासाठी घराबाहेर आलेल्या माऊलीला नियमाचा दंडुका…आणि दुसरीकडे आंदोलनाच्या नावावर दुधाचा अपमान करणाऱ्यांना अभय… ? कोरोना कधी ना कधी जाईल…पण या वृत्तीचा संसर्ग नक्कीच समाजाला पोखरेल अशी भीती आहे.
@अनुराधा कदम

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes