+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustजिल्हा परिषदेमार्फत 'गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रम* adjustहिंदू देव देवितांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन adjustहुकुमशाही विषवल्ली तोडून टाकण्यासाठी नारीशक्ती एक व्हा आणि शाहूंना विजयी करा adjustखतीजा शकील मेस्त्री राज्यात पहिली adjustजनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी शाहू महाराजांना निवडून द्या adjustनिगवे येथे शाहू छत्रपतींनी साधला संवाद adjustमाजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी दिला शाहू महाराजांना शब्द adjustदेशात भाजपचा हुकूमशाही कारभार ;सौरभ खेडेकर यांची टीका adjustशाहू छत्रपती यांची रंगपंचमी; संभाजी राजे यांची जूनची हमी adjustगोकुळ’ च्या कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन संघाच्या आणि दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी काम करावे
schedule13 Mar 24 person by visibility 51 categoryराजकीय
गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कारकोल्‍हापूरःता.१३. 

गाय दूध अनुदानात काम करणाऱ्या दूध संस्थांना शासनामार्फत मोबदला मिळवण्यासाठी गोकुळने पाठपुरावा केलेबद्दल कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या वतीने गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळ यांचा सत्कार संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील व संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे करण्‍यात आला.

          यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, शासनाच्या गाय दूध अनुदान प्रकियेमध्ये प्राथमिक दूध संस्था महत्वाची भूमिका बजावत असून त्यांच्या प्रयत्नातून दूध उत्पादकांना हे थेट अनुदान मिळण्यास मदत होत आहे. दूध संस्था कर्मचारी यांनी संस्था पातळीवरील कामकाजामध्ये गतिशीलता आणून जास्तीत जास्त दूध उत्पादकांना अनुदान मिळवून देण्यास प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले.

          यावेळी संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील म्हणाले कि, गोकुळ ने नेहमीच दूध उत्पादक, प्राथमिक दूध संस्था, संस्था कर्मचारी या सर्वाचे हित जपले असून दूध संस्था कर्मचारी संघटनेला गोकुळचे नेहमीच सहकार्य लाभले आहे. गाय दूध अनुदानात काम करणाऱ्या दूध संस्थांना शासनामार्फत मोबदला मिळवण्यासाठी गोकुळने यशस्वी पाठपुरावा केलेबद्दल गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व सर्व संचालक मंडळ याचे आभार व्यक्त केले.

याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, जेष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ. शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील, शामराव पाटील,विश्वास पाटील, सुरेश जाधव, संघटनेचे पदाधिकारी, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.