Awaj India
Register
Breaking : bolt
आदर्श शिक्षिका संगिता अशोक वायदंडेशालीग्राम विक्रम गवई यांची कौतुकास्पद कामगिरीआदर्श शिक्षिका सन्मान : श्रीमती ज्योती मसा कांबळे यांचा गौरवआदर्श शिक्षिका : सौ. अनिता कुंडलिक सातवेकर यांची प्रेरणादायी कामगिरीसौ. शिल्पा नितीन गवळी यांची उल्लेखनीय कामगिरीफुले–शाहू–आंबेडकर फोरमतर्फे संविधान दिनाचे औचित्य साधून व्याख्यान व सत्कार समारंभएस. पी. दिक्षित यांना ‘महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कार’ सहाय्यक प्राध्यापिका सुमन प्रभाकर कांबळे यांना महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कार जाहीर महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्काराने प्राध्यापिका सौ. सुमन अक्षय कांबळे सन्मानित डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातापदी डॉ. राजेश ख्यालप्पा

जाहिरात

 

आदर्श शिक्षिका संगिता अशोक वायदंडे

schedule26 Nov 25 person by visibility 4 categoryशैक्षणिक

आदर्श शिक्षिका संगिता अशोक वायदंडे
 

को़ल्हापूर 

शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाशफुलं फुलवणाऱ्या सौ. संगिता अशोक वायदंडे यांचा आदर्श शिक्षिका म्हणून अनेक जण उल्लेख करत आहेत. तब्बल ३४ वर्षांची अखंड, निस्वार्थी, गुणवत्तापूर्ण सेवा त्यांच्या नावावर असून, विद्यार्थ्यांमध्ये कर्तव्यनिष्ठा, मूल्यशिक्षण आणि उत्कृष्ट घडण घडविण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले आहे.

वायदंडे मॅडम यांनी २० ऑगस्ट १९८९ रोजी सेवेत रुजू होत विक्रम एज्यु. सोसायटीच्या विक्रम हायस्कूलमध्ये प्राथमिक तसेच माध्यमिक विभागात कार्य केले. २०१८ पासून त्या न्यू इंग्लिश स्कूल, गडमुडशिंगी येथे कार्यरत आहेत. मराठी आणि हिंदी या विषयांत त्यांनी इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना अत्यंत दर्जेदार अध्यापन दिले आहे.

शैक्षणिक मार्गदर्शनात त्यांचे योगदान लक्षणीय आहे. इयत्ता ५ वी व ८ वीच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या शासकीय स्कॉलरशिप मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना दिलेले विशेष मार्गदर्शन, स्मार्ट पीटीमधील सक्रिय सहभाग आणि बोर्ड पेपर तपासणीतील त्यांच्या नेमस्त कामामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण निकालात सातत्याने वाढ झाली.

सामाजिक जाणिवेतून त्यांनी अनेक गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शैक्षणिक मदत, गणवेश व साहित्य वाटप, तसेच पुरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला. शालेय हस्तलिखिताच्या संपादक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांमधील लेखनकौशल्य वाढविले तर नियोजन समिती प्रमुख म्हणून शाळेचे विविध उपक्रम यशस्वीरीत्या राबविले. वृक्षारोपण मोहिमेत शाळा व ग्रामपंचायत परिसरात सहभाग घेत पर्यावरणसंवर्धनाचाही संदेश दिला.

शेकडो विद्यार्थ्यांना विविध सरकारी पदांवर पोहोचविण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा मानला जातो. सेवाभाव, मृदु स्वभाव, कार्यतत्परता, विद्यार्थ्यांप्रती आईसदृश जिव्हाळा आणि सातत्यपूर्ण मेहनत यामुळे त्या आज परिसरातील ‘आदर्श शिक्षिका’ म्हणून ओळखल्या जातात.

सौ. संगिता अशोक वायदंडे यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्याच्या पाऊलखुणा आजही समाजाला प्रेरणा देणाऱ्या आहेत. त्यांच्या या योगदानाचा गौरव करण्यासाठी आदर्श शिक्षिका पुरस्काराचा प्रस्ताव पुढे सरसावला असून, स्थानिक शिक्षण क्षेत्रातून याचे विशेष स्वागत होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes