आलिशान फ्लॅटमध्ये झाली अमावस्येच्या रात्री अघोरी पूजा
schedule04 Jul 23 person by visibility 354 categoryगुन्हे
*आलिशान फ्लॅटमध्ये झाली अमावस्येच्या रात्री अघोरी पूजा*
कोल्हापूर : (आवाज इंडिया प्रतिनिधी)
कोल्हापुरातील उच्चभ्रू वस्ती मध्ये एक नामवंत रहिवाशी संकुल आहे. या संकुलामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विभागात काम करणारे शासकीय अधिकारी देखील राहत आहेत. याच निवासी संकुलात तीन महिन्यांपूर्वी अमावस्येच्या रात्री सांगलीच्या भोंदू बाबांने विधीवत अघोरी पूजा केली. पूजेसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू आदल्या दिवशीच पूजेसाठी या फ्लॅटमध्ये आणण्यात आल्या होत्या. या पूजे संदर्भात अत्यंत गुप्तता पाळण्यात आल्याने दोन दिवसात चोर पावलांनी या वस्तू या फ्लॅटमध्ये या भोंदू बाबाने आणल्या.
या परिसरात असणाऱ्या 5 वॉचमन याना देखील अघोरी पूजा होणार आहे याचा पत्ता नव्हता.
संध्याकाळी सहा नंतर या पूजेची फ्लॅटमध्ये तयारी सुरू झाली पूजा ही रात्रभर सुरू राहणार असल्याने पूजेदरम्यान कोणताही व्यक्ती येऊ नये, कुठलीही साधनसामुग्री कमी पडू नये यासाठी या भोंदू बाबाने सर्व काळजी घेतली होती .
*पूजे संदर्भात भोंदू बाबांने दिली पूर्वकल्पना*
अमावस्येच्या रात्री एक देवीची पूजा करण्यात येणार
तुझ्या आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी अघोरी पूजा करणार
पूजेदरम्यान कोणतेही वस्त्र अंगावर परिधान करायचं नाही
तुझ्या शरीरात शिरलेली दृष्ट शक्ती बाहेर काढणार, अश्या भूलथापा त्या भोंदूबाबने मारल्या.
*अशी झाली अघोरी पूजा*
या इमारतीमधील फ्लॅटच मध्ये पूजा मांडण्यात आली. या रूमच्या मध्यभागी एक छोटा हवन तयार करण्यात आला होता. आणि त्याच्या सभोवताली फुलांनी ही जागा सजवण्यात आली होती. पूजेच्या ठिकाणी विविध देवींच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या. तर ज्याची पूजा करायची होती तिला एका पाटावर हात जोडून बसवण्यात आले होते. अगरबत्ती धूप लावून मध्यरात्री बारा वाजता या पूजेला सुरुवात झाली. ठरल्याप्रमाणे पूजेचा सर्व विधी सुरू झाला. अघोरी पूजा करून वाईट शक्ती शरीरातून बाहेर काढणाऱ्या भोंदूबाबने पहाटे पर्येंत ही पूजा केली....
*क्रमशः*
*आवाज इंडियाच्या मालिकेचा भोंदूबाबने घेतला धसका, भोंदूबाबाचा झाला 'सर'*