पंचगंगा प्रदूषण प्रश्न उद्योजकांची बैठक घेऊन प्रश्न सोडवणार : आबिटकर
schedule02 Feb 25 person by visibility 57 categoryआरोग्य
कोल्हापूर:
शिरोळ प्रदूषणाबाबत इचलकरंजीतील सर्व उद्योजकांची बैठक घेऊन त्यावर योग्य तोडगा काढणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री व कुटुंब कल्याण पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन बैठकीत शिरोळ तालुक्यातील 13 गावे नदीच्या प्रदूषणाने चिंताग्रस्त आहेत असा प्रश्न उपस्थित केला यावर अबिटकर यांनी उत्तर दिले.
वीस वर्षापासून पंचगंगा प्रदूषित असल्यामुळे 13 गावांना याचा फटका बसत आहे. प्रसंगी शेती नापीक होत आहे. येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. पिण्याला पाणी योग्य मिळत नाही याबाबत पालकमंत्री यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही आपण यात लक्ष घालणार का असे विचारले असता अबिटकर यांनी लवकरच बैठक घेऊन याच्यावर योग्य तोडगा काढू असे उत्तर दिले.
उद्योजकांच्या पेक्षा जनतेला त्याचा कोणताही त्रास झाला नसला पाहिजे याची दक्षता यापुढे घेतली जाईल असेही आबिटकर यांनी सांगितले.
याबाबत राजर्षी शाहू विकास आघाडीचे विश्वास बालीघाटे, जनता दलाचे सरचिटणीस प्रवीणबाई माणगावे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे अध्यक्ष संजय आणूसे, जनता दलाचे सरचिटणीस अण्णासो मगदूम,बहुजन विकास आघाडी शिरोळचे तालुका अध्यक्ष रणजीत पाटील यांनी बैठक घेऊन प्रदूषण अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते.