नस्ती महानगरपालिकेतून खाजगी ठिकाणी नेणाऱ्यांवर फौजदारी करा
schedule18 Aug 26 person by visibility 17 category
कोल्हापूर : कोल्हापूर महानगपालिकेची मा. सर्वसाधारण सभा नियोजीत आहे. या सभेतील काही विषयांच्या नस्ती अभ्यासासाठी माझ्या महानगरपालिकेतील कार्यालयात मागविणेसाठी मी सहकारी नगरसेवक श्री. विजयसिंह खाडे पाटील आणि कार्यालयीन कर्मचारी यांना नगरसचिव कार्यालयात पाठविले होते. त्या ठिकाणी त्या वेळी केवळ १ शिपाई उपस्थित होते. सदर व्यक्तिकडे संबंधीत विषयांच्या नस्ती संदर्भात विचारणा केली असता "विरोधी पक्षांची पार्टी मिटींग असल्यामुळे त्या नस्ती विरोधी पक्षनेता कार्यालयात नेल्या आहेत." असे त्यांनी सांगितले. त्यावरुन श्री. खाडे-पाटील व कर्मचारी विरोधी पक्ष नेता कार्यालयात गेले असता सर्व नस्ती पार्टी मिटींगसाठी नागाळा पार्कातील एका खाजगी कार्यालयात नेल्याचे सांगणेत आले.
वस्तुतः कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकृत नस्ती महानगरपालिका इमारती बाहेर नेता येत नाहीत. त्यातच उद्या महासभा असतांना नगरसचिव कार्यालयातून विषय सुचिवरील विषयांच्या नस्ती महानगरपालिके बाहेर जाणे अत्यंत गंभीर आहे. अशा प्रकारे मा. सर्वसाधारण सभेच्या आदल्या दिवशी सभेच्या विषय सुची वरील नस्ती महनगरपालिके बाहेर नेणाऱ्या सर्व व्यक्तिवर योग्य त्या कलमा खाली त्वरीत फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सभागृह नेता मुरलीधर पांडूरंग जाधवशिवसेना पक्ष गटनेता शारंगधर वसंतराव देशमुख यांनी केली.