Awaj India
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या ४९ विद्यार्थ्यांची निवडचळवळ टिकण्यासाठी एकत्र येणे गरजेचे ; उत्तम कांबळेअण्णा ब्रिगेडचे संस्थापक डॉ.अमोल महापुरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा*पंचगंगा प्रदूषण प्रश्न उद्योजकांची बैठक घेऊन प्रश्न सोडवणार : आबिटकरनदी प्रदूषण प्रश्नी प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा : माणगावेडॉ. डी. वाय. पाटील कृषि महाविद्यालयाच्या* *दोन माजी विद्यार्थ्यांची अन्न व प्रशासन विभागात निवड*डी. वाय पाटील कृषी विद्यापीठाच्या* *13 विद्यार्थ्यांची डी - मार्टमध्ये निवड*डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक टाटा मोटर्स पुणे यांच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न*शिलेदार हायकर्स फाउंडेशनतर्फे मोफत शालेय बँगचे वाटपनदी प्रदूषित करणाऱ्यांच्यावर कारवाई करावी

जाहिरात

 

अखेर नवरात्रोत्सवाच्या धामधुमीला सर्वत्रच सुरूवात,.

schedule08 Oct 21 person by visibility 99 categoryसामाजिक


सिंधुदुर्ग : संजय भोसले : कोरोनाच्या छायेखाली असल्यामुळे गेले दोन वर्षे लोकांना आपले सन, समारंभ,ऊत्सव हव्या त्या पद्धतीने साजरे करता येत नाहीत.ही शोकांतिका कोणीही नाकारू शकत नाही. तरीही महाराष्ट्रात सरकारी नियम पाळून आनंदोत्सव साजरे केले जातातच.
        
नवरात्रोत्सव हा देखील तरूणाईचा अत्यंत लाडका आणि आनंददायक असणारा ,हवा हवासा वाटणारा उत्सव आहे. कारण या कालावधीत नऊ रात्री जागून , डि जे च्या तालावर बेधुंद होऊन थिरकायला मिळते. पण सध्या सरकारच्या कडक निर्बंधातच हा ऊत्सव साजरा करावा लागणार आहे.
    
वास्तविकता:— रामायणा नुसार नवरात्रौत्सव हा निश्रृतीपुत्री दुर्गेचा उत्सव मानला जातो.हा सण शाक्तसंस्कृतीचा सर्वात मोठा उत्सव मानला जात असे.या नवरात्रौत्सवाची सुरूवात घटस्थापनेने होते.ही घटस्थापना म्हणजे भूमातेचे पूजन होय.शेतीच्या शोधाचे श्रेय निश्रृतीला जाते,त्याचे स्मरण करणारा हा सण आहे.
      
दुर्गा ही निश्रृतीची मुलगी तिच्याही नावे हा सण साजरा होतो.निश्रृतीच्या त्रिअंबेच्या ज्ञातीच्या शाखेतील पुढील वंशजा सिता (रामायनाची नायीका)आहे.मातीच्या गाळात कडधान्य मिसळून त्यावर पाण्याने भरलेले गाडगे ठेवले जाते.हेच सिता पुजन आहे.सितेच्याआगमणाचा हा सोहळा आहे.मातृसत्ताक कुटूंब व्यवस्थेकडून पितृसत्ताक कुटूंब व्यवस्थेकडे जाणारा संक्रमनाचा कालावधी (नांगराच्या फाळाला सिता लागणे) हिच सिता जयंती होय. 
      
हजारो वर्षा पासून आमच्या माय माऊल्यानी सितेची व्यथा एका सणा द्वारे सांभाळून ठेवली आहे.सितेच दुःख आपल्या उरी कवटाळून ठेवल आहे."सिते सारख दुःख, वेदना,शोषण,पिडण कोणाही स्रीच्या वाट्याला न येवो".
       तांत्रिक श्रृतीला गतीमान करण्याचा हाच काळ मानला जातो.निश्रृतीच्या हस्ते शेतीच्या शोधाने सुरू होणाय्रा घटस्थापनेच्या उत्सवाला महत्वाचे मानले जाते.
     
दुसरी बाजू:—पौराणिक संदर्भानुसार महीषासुर नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर उन्माद माजवला होता.त्याचा बंदोबस्त करण्यासाठी शक्तिदेवता प्रखट झाली. शक्तिदेवता व महिषासुर यांच्यात नऊ दिवस युद्ध झाले.अखेर नवव्या दिवशी महिषासुराचा वध झाला.यावरून महिषासुर मर्दिनी हे नाव पडल .हेच ते नऊ दिवस व नऊ रात्री देवीच्या उपासनेचा काळ म्हणून ओळखला जातो.या रात्री देवीचा जागर केला जातो,देवीच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला जातो.त्यालाच नवरात्रोत्सव म्हणतात.
         
तसे पाहता संपूर्ण भारतात १०८शक्तिपिठे आहेत पण महाराष्ट्राच्या वाट्याला अवघे साडे तिन पिठच आले आहेत ती श्रद्धापिठे म्हणजे कोल्हापुरची आंबाबाई, तुळजापुरची तुळजा भवानी,माहूरची रेणुकादेवी आणि अर्धे श्रद्धापिठ म्हणजे नाशिकची सप्तश्रृंगी होय.
        
सद्य स्तिथी:—या सर्व श्रद्धेच्या साडेतीन पिठा बरोबरच महाराष्ट्रात अगदी खेड्या पाड्यात सुद्धा नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम इमाने इतबारे साजरा केला जातो.पणत्याचे स्वरूप आता बदलले आहे.महागातले महाग कपडे खरेदी करून तरूणाई अगदी बेधूंद होऊन डि जे च्या तालावर नाचून (दांडीया/रासगरबा खेळून) नऊ रात्री जागून काढतात.तर स्रिया नऊ दिवस वेग वेगळ्या रंगाच्या साड्या परिधान करून अगदी साजेसा श्रृगांर करून नवरात्रोत्सवाचा आनंद लूटतात तर काही भाविक उपोषण करून,चपलांचा त्याग करून अनवानि पायाने देवीची उपासना केली जाते.
          
हे सर्व करत असताना प्रत्येकानी मर्यादेच भान ठेवल पाहीजे. पालकान आपल्या पाल्यावर बारीक नजर ठेवली पाहीजे .तरूणाई कडून कोणताही अनुचीत प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेतली पाहीजे. सरकारने घालून दिलेले सगळे कोरोनाचे निर्बंध पाळले पाहीजेत की जेणेकरून या नवरात्रोत्सवाला,आनंदोत्सवाला गालबोट लागू नये.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes