शेतकऱ्याला 4 पैसे जास्त मिळणार असतील तर विरोधकांना पोटशूळ का ? - दिलीप पाटील, चेअरमन
schedule29 Sep 21 person by visibility 99 categoryसामाजिक
![](_awajindia.com/u/pos/202109/Screenshot_2021-09-29-16-35-00-96--800.png)
कोल्हापूर : राजाराम साखर कारखान्यात महाडिक साहेबांच्या नेतृत्वाखाली उत्तम कारभार सुरू आहे आणि म्हणूनच इथे प्रत्येक सभासदाशी (विरोधक असला तरी) बांधिलकी ठेवली जाते, सहकारी तत्वांचं पालन केलं जातं. सभासदांचे प्रश्न आल्यानंतर लगेचच 24 तारखेला त्यांची लेखी उत्तरं रजिस्टर्ड पोस्टाद्वारे आम्ही पाठवलेली आहेत, तसेच सभासदांच्या माहितीसाठी सर्व प्रश्न-उत्तरे कारखान्याच्या अँप्लिकेशनवर सुद्धा अपडेट केलेली आहेत . तरीही जे टीका करतायत त्यांना मला आवर्जून विचारायचं आहे की, आज तुमची सत्ता असणाऱ्या सप्तगंगा (नाव बदलल्यानंतर डी.वाय.पाटील) साखर कारखान्यामध्ये इथेनॉल प्रकल्प का उभा केला? त्या कारखान्यात आज किती सभासद शिल्लक ठेवले आहेत ? शिल्लक असलेल्या त्या मोजक्या सभासदांना कधी अहवाल पाहण्यास तरी दिला का? एकंदरीत आजघडीला तिथे सहकार किती शिल्लक ठेवला आहे?
सप्तगंगा कारखान्याचा नावासकट सहकारी धोरणांना तिलांजली देणाऱ्यांकडून राजाराम कारखान्याचा सहवीज निर्मिती प्रकल्प व भविष्यातील इथेनॉल प्रकल्प उभारणीला खोडा का घातला जातोय हा खरंतर गंभीर प्रश्न आहे. आता यांचेच नेते गोकुळच्या माध्यमातून माझ्या जिल्ह्यातल्या गोरगरीब दूध उत्पादकांच्या हक्काचे शेकडो कोटी रुपये बाहेर मुंबईला गुंतवायला निघालेत. पण आम्ही कारखान्याचे विस्तारीकरण करून इथल्या आमच्या युवकांच्या हातांना रोजगार देण्याचा, शेतकऱ्याला 4 पैसे जास्त मिळवून देण्याचा विचार केला तर यांना लगेच पोटशूळ उठायचं कारण काय ? एकंदरीत अविर्भावातून यांचा जिल्ह्यातून सहकार संपविण्याचा तरी डाव नाही ना ? असं वाटायला लागलंय.
आमची सर्वसाधारण सभा ही पूर्णपणे सहकारी तत्वांना विचारात ठेऊन पार पडेल. महाडिक साहेब व त्यांचे संचालक मंडळ आहे तोवर राजाराम कारखान्याच्या प्रत्येक सभासदाचे हक्क शाबूत राहतील. व आमचा कारखाना अश्या कोणत्याही राजकीय विरोधाला बळी न पडता अखंड प्रगती करत राहील, याचा मला विश्वास आहे.