जिल्हा परिषद प्रशासनाकडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्यावर अन्याय
schedule25 Jul 23 person by visibility 382 categoryगुन्हे
कोल्हापूर (आवाज इंडिया प्रतिनिधी)
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातूनच पेन्शनसाठी पैसे जमा केलेे जातात. मात्र ही पेन्शन देतानाच प्रशासन आडवे आल्याचा प्रत्यय कोल्हापुरातील जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना झाला आहे.तुमच्या जातीच्या दाखल्यावर महादेव कोळी आहे ते कोळी महादेव का नाही असं कारण देत प्रशासनाने त्यांना पेन्शन देणे टाळले आहे.
जिल्हा परिषदेतील 21 कर्मचारी सेवानिवृत्त आहे मात्र त्यांना 1 वर्षापासून पेन्शन मिळालेली नाही.पेन्शन मिळत नाही या कारणाने शिक्षक आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. आपलेच हक्काचे पैसे न मिळाल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशाराही दिला आहे.
सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक अण्णासो शिरगावे
यांनी जिल्हा परिषदेच्या आस्थापनेतील सर्व कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळते. आम्हाला मात्र मिळालेले नाही जिल्हा परिषद प्रशासनाने आमच्यावर अन्याय केला असल्याचेही शिरगावे यांनी सांगितले.
याबाबत सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग भीमू आंबी म्हणाले, 31 मे 2022 निवृत्त होऊन सुद्धा अद्याप पेन्शन मिळालेली नाही.न्यायालयीन लढाई जिंकलो तरी सुद्धा पेन्शनसाठी झगडावे लागत आहे.
महादेव कोळी समाजातील तज्ञ अभ्यासक प्रोफेसर बसवंत पाटील म्हणाले, न्यायालयाचे निकाल आमच्या बाजूने असताना सुद्धा जात पडताळणी कार्यालयात त्याची पूर्तता होत नाही. आस्थापनातील याच जातीच्या इतर कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत असेलतर 21 कर्मचाऱ्यांच्या वर अन्याय का.
जिल्ह्यातील मनपा , एम एस ई बी ,राज्य परिवहन महामंडळ आदी सर्व अस्थापणेतील सेवा निवृत्तीचे लाभ शासन नियमानुसार देण्यात आले आहेत मग जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातच हा दुजाभाव का। ?
अशा प्रकरणात न्यायालयाने सुद्धा प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत मात्र प्रशासन ऐकायला तयार नाही. याबाबत मोठे आंदोलन उभा करणार असल्याचे सुद्धा पाटील यांनी सांगितले.