आदर्श शिक्षक सुरेंद्र तिके सर : बहुआयामी कार्याची राज्यभर दखल
schedule26 Nov 25 person by visibility 11 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : भारत भूषण विद्यालयाचे शिक्षक सुरेंद्र आत्माराम तिके हे शिक्षणक्षेत्रातील नवनवीन उपक्रम, तंत्रस्नेही कार्यपद्धती आणि सामाजिक बांधिलकी यासाठी ओळखले जातात. तब्बल 19 वर्षांची उल्लेखनीय सेवा बजावताना तिके सरांनी केलेल्या कामांची आज जिल्ह्यात सर्वत्र प्रशंसा होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या दीक्षा अॅपसाठी इयत्ता ४ थी – परिसर अभ्यास या विषयातील दोन QR कोड्सची राज्यस्तरीय निवड होणे हा त्यांचा विशेष सन्मानाचा टप्पा ठरला आहे. तिके सर शाळासिद्धी विभागीय निरीक्षक म्हणूनही प्रभावी काम पाहत आहेत.