Awaj India
Register
Breaking : bolt
खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण* :वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडून विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा*वनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा. डॉ. के. प्रथापन* चुये येथे बेंदूर सण उत्साहात साजरावह्याची मदत गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी, आभाळा इतकी; डॉ. राजन गवसव्हनाळी उपसरपंचपदी संजयबाबा घाटगे गटाच्या अश्विनी जांभळे यांची निवडट्रिपलसीट व एकेरी मार्ग उल्लंघनावर दोन लाख रुपयांचा दंड वसूल भारत गौरव पर्यटन ट्रेन’चे कोल्हापूरात आगमन*सतेज पाटील यांच्या वाढदिवसाचे दातृत्व; गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचे कर्तुत्व वाडीपीर येथील जलजीवन मिशन; कोणी खाल्ले जास्त कमिशन

जाहिरात

 

मणेरमळा सरनोबतवाडी येथे कसबा बावड्यातील युवतीचा खून

schedule03 Jun 25 person by visibility 1000 categoryगुन्हे

कोल्हापूर ;
कसबा बावडा ( ता. करवीर ) येथील समीक्षा उर्फ आर्या भारत नरसिंगे बागडी हिचा सरनोबतवाडी मणेर मळा येथे खून करण्यात आला आहे. संशयीत आरोपी सतीश यादव फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
दुपारी म णेरमाळा येथे घटना घडली.संबंधित युवतीबरोबर राहणारी मैत्रीण व तिच्या सहकाऱ्यांनी तिला
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आली. उपचारापूर्वी डॉक्टरांनी तिला मृत्य घोषित केले.
समिक्षा इव्हेंटचे काम करत होती. विवेकानंद महाविद्यालय येथे तिने पदवीची शिक्षण पूर्ण केले आहे. मैत्रिणीबरोबर ती सरनोबतवाडी येथील मनेर मळा या ठिकाणी ती फ्लॅट घेऊन राहत होती. मुळचा उंड्री आणि सध्या शिवाजी पेठेत राहणारा सतीश यादव तरुणाने तिला चाकू मारला असल्याचे तिच्याजवळ असणाऱ्या मैत्रिणीने सांगितले. दोन दिवसापूर्वी त्या युवकाबरोबर भांडण झाल्याची सुद्धा आईने सांगितले. 
कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या जयभवानी गल्लीत भरत नरसिंगे हे पत्नी सुवर्णा, मुलगी समिक्षा, गौतमी आणि मुलगा वैभव यांच्यासह राहत होते. सात वर्षापूर्वी भरत नरसिंगे यांचा मृत्यू झाला. त्यामुळं कुटूंब उघड्यावर पडलं. मुलांची जबाबदारी पडल्यानं, सुवर्णा यांनी मासे विकून कुटूंबाची गुजरान सुरू केली. दरम्यान त्यांची थोरली मुलगी समिक्षाचा कोल्हापुरातील एका तरूणाबरोबर विवाह झाला होता. त्यानंतर त्यांच्यात वितुष्ट आलं. बी ए चं शिक्षण पूर्ण करून, समिक्षानं इव्हेंटमॅनेजमेंटचं काम करण्यास सुरवात केली. काही महिन्यापूर्वी तिची ओळख मुळचा उंड्री आणि सध्या शिवाजी पेठेत राहणारा सतीश यादव याच्याशी झाली. तोही खाजगी ठिकाणी काम करत होता. तीन महिन्यांपूर्वी सतीश यादवनं सरनोबतवाडी इथल्या एका अपार्टमेंटमध्ये भाडेतत्वावर फ्लॅट घेतला होता. या फ्लॅटमध्ये समिक्षा नरसिंगे आणि सतीश यादव हे राहत होते. तर त्याच फ्लॅटमध्ये समिक्षाची तेलंगणा येथील मैत्रीण आयषु आंबले ही देखील राहत होती. तिही इव्हेंटमॅनेजमेंटचं काम करत होती. गेल्या काही दिवसांपासून समिक्षा आणि सतीश यांच्यामध्ये खटके उडू लागले. त्यामुळं वैतागून समिक्षा आणि तिची मैत्रिण आयषु या दोघी कसबा बावड्यातील आईच्या घरी राहत होत्या. गेल्या तीन दिवसांपासून सतीश यादव आयषु हिला वारंवार फोन करून समिक्षाला भेटायचं असल्याचं सांगत होता.  
 आज दुपारी एक वाजता समिक्षा आणि आयषु दुचाकीवरून सरनोबतवाडी इथल्या फ्लॅटवर गेल्या. तिथं सतीश यादव आला. त्याच्याकडं फ्लॅटची किल्ली होती. रूम मधील साहित्य घेवून घरी जायचं असा समिक्षा आणि आयषुचा प्लॅन होता. मात्र रागात असलेल्या सतीश यादवनं अचानक त्याच्याकडील चाकूनं समिक्षावर हल्ला केला. त्याला रोखण्यासाठी आयषुनं प्रयत्न केला. मात्र तिच्याही हाताला जखम झाली. अशातच सतीशनं समिक्षाच्या छातीमध्ये भोकसल्यानं ती जमिनीवर कोसळली. प्रचंड रक्तस्त्राव होवू लागला. संधी साधून सतीश यादवनं त्या ठिकाणाहून पळ काढला. जाताना दरवाजाला बाहेरून कडी घातली. त्यामुळं समिक्षाला लवकर मदत मिळाली नाही. ती तडफडत होती. दरम्यान आयषुनं तिचा वसगडे इथला मित्र अभिषेक सोनवणे याला फोन केला. त्यानं येवून रूमचा दरवाजा उघडला. त्यानंतर खाजगी वाहनातून प्रथम राजारामपूरीतील खाजगी रूग्णालयात तर नंतर सीपीआर मध्ये समिक्षाला दाखल केलं. मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितलं. या घटनेची माहिती समिक्षाच्या कुटूंबियांना मिळाली. त्यांनी सीपीआरमध्ये धाव घेतली. दरम्यान करवीरचे पोलिस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर, लक्ष्मीपूरीचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, गांधीनगरचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी आणि सीपीआर मध्ये माहिती घेतली. तसंच संशयित सतीश यादव याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांसह विविध पथकं रवाना झाली आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes