Awaj India
Register
Breaking : bolt
शिवाजी भिमाजी परळीकर यांना संविधान प्रसारक आदर्श मूकनायक पुरस्कारचंद्रकांत चषक -२०२५" फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळ व श्री शिवाजी तरुण मंडळ विजयीमच्छिंद्र कांबळे यांना आदर्श मूकनायक पुरस्कारप्रा. प्रमोद झावरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कारडॉ. भाग्यश्री मल्लिकार्जुन पाटील यांना आदर्श शिक्षिका पुरस्कारआरती वैशाली मनोहर कांबळे यांना मूकनायक पुरस्कार कोल्हापूरकोल्हापूर मेडिकल असोसिएशन तर्फे व्यसनमुक्ती अभियानसागर कांबळे यांना आदर्श मूकनायक पुरस्कारप्रा. जितेंद्र भारमगोंडा यांना आदर्श शिक्षक पुरस्कारगायक नामदेव हसुरकर यांना आदर्श मूकनायक पुरस्कार

जाहिरात

 

महापालिकेच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज दिव्यांग सक्षमीकरण अभियान

schedule26 Jun 21 person by visibility 99 categoryसामाजिक

 कोल्हापूर – शहरातील दिव्यांग व्यक्तीसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांचे जीवनमान उंचाविणे आवश्यक आहे. यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक 26 जून 2021 पासून राजर्षी छत्रपती शाहू महाराज दिव्यांग सक्षमीकरण अभियान महापालिकेच्यावतीने राबविण्यात येत आहे. समाजातील सर्व घटकांना समान वागणूक व न्याय मिळावा यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील वंचित / दुर्बल घटकासाठी खूप मोठे कार्य केले आहे. या समाजातील सर्व घटकांना समानतेची वागणूक मिळावी म्हणून त्यांनी शाळा, दवाखाने, सार्वजनिक इमारती सर्वांसाठी खुल्या केल्या, त्याचबरोबर त्यांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले.  

दिव्यांग म्हणजे कार्यात्मक आरोग्याचा अभाव किवा जो व्यक्ती मानसिक किवा शारीरिक दृष्ट्या स्वतःचे काम करण्यास सक्षम नसतो. नैसर्गिकरित्या किंवा अपघाताने अपंगत्व आलेल्या समाजातील दिव्यांग व्यक्तीना त्यांचे हक्‍क प्राप्त करून देणे. त्यांच्यासाठी जाहिर केलेल्या योजनांचा त्यांना पूर्ण लाभ मिळवून देंणे यासाठी शासन नेहमी आग्रही असते. या गोष्टीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची आवश्यकता आहे. यासाठी महापालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे.

अभियानाचा मुख्य उद्देश याअभियानांतर्गत महानगरपालिका हद्दीतील सर्व दिव्यांगांची नोंदणी करणे, त्यांची तपासणी करून त्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ दिव्यांगांना देऊन त्यांचे जीवनमान उंचाविण्यात येणार आहे. दिव्यांगांच्या आरोग्य विषयक पुढील सेवा उपलब्ध करून देऊन त्यांच्या अपंगत्वावर मात करण्याचा प्रयत्न करणे हा या अभियानाचा' मुख्य उददेश आहे.

अभियानाचे मुख्य उद्दिष्टे

य अभियानाअंतर्गत शहरातील सर्व दिव्यांग व्यक्तीची नोंदणी १००% करून ती संकेतस्थळावर Online उपलब्ध करणे. दिव्यांग प्रमाणपत्र नसलेल्या लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांना अपंगत्व/दिव्यांगत्व प्रमाणपत्र देणे. तपासणी नंतर पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या दिव्यांगाना संदर्भ सेवा देऊन शासनाच्या विविध योजनेव्दारे उपचाराच्या सुविधा उपलब्ध करून देणे. दिव्यांगांसाठी उपकरणे आवश्यक असल्यास उपलब्ध करून देणे. (उदा.५% अपंग/दिव्यांग निधी, इतर शासकीय योजना, स्वयंसेवी संस्था, CSR इ.) प्रमाणपत्र प्राप्त लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे' लाभ देण्यासाठी मेळाव्यांचे आयोजन करणे. (उदा.५% खर्च योजना, विमा योजनेचा लाभ मिळवून देणे, पेन्शन योजना, एसटी/रेल्वे पास, आणि इतर शासकीय लाभ इ.). सर्व पात्र दिव्यांग लाभार्थींना ' स्वावलंबन कार्ड ' उपलब्ध करुन देणे हा महापालिकेचा मुख्य उद्दिष्ठ ‍आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes