गायक नामदेव हसुरकर यांना आदर्श मूकनायक पुरस्कार
schedule01 Apr 25 person by visibility 348 category

कोल्हापूर;
कृती फाउंडेशन कोल्हापूर यांच्यावतीने हसुर दुमाला
(ता. करवीर,)येथील नामदेव हसुरकर यांना आदर्श मूकनायक पुरस्कार जाहीर करण्यात आला. रविवारी (दि.6 एप्रिल) शाहू स्मारक भवन कोल्हापूर, येथे साडेचार वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
हसुरकर यांनी आत्तापर्यंत सोळा वर्षे प्रबोधनाचे कार्यक्रम राबवलेले आहेत. बुद्ध भीम वंदना यांच्या गीतांचा कार्यक्रम सादर करत त्यांनी त्या कार्यक्रमात नाटिका सुद्धा बसवलेल्या आहेत. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाल्यानंतर झालेला सत्कार, माणगाव परिषद, छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा नाटिका बसवत बहारदार कार्यक्रमाचे सादरीकरण करतात.
बुद्ध- भिम गायनातून समाज परिवर्तन घडवणारे मनोरंजनातून प्रबोधन व प्रबोधनातून परिवर्तन असा राज्यस्तरीय प्रथम क्रमांक विजेता कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श मूकनायक पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.