रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन
schedule11 May 22 person by visibility 99 categoryराजकीय
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने दसरा चौकात येथे विविध मागण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे मागासवर्गीयांची पदोन्नती झाली पाहिजे भूमिहीन यांना जमिनी दिल्या पाहिजेत ओबीसींना आरक्षण मिळालेच पाहिजे या मागण्यासाठी दसरा चौक येथे आंदोलन करण्यात आले.
ज्येष्ठ विचारवंत बीके कांबळे जिल्ह्याचे नेते सतीश माळगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन घेण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ओबीसींना आरक्षण मिळालाच पाहिजे मागासवर्गीयांची पदोन्नती झालीच पाहिजे मागासवर्गीय भूमिहीनांना जमीन मिळालाच पाहिजे मागणी मान्य करणाऱ्या राज्य सरकारचा धिक्कार असो बोलो रे बोलो जय भीम बोलो या घोषणांनी दसरा चौक परिसर दणाणून सोडला.
निळा झेंडा लावत कार्यकर्त्यांचे आगमन दसरा चौकात झाले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर आंदोलन सुरू होते याचाच भाग म्हणून सतीश माळगे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापुरात दसरा चौक येथे आंदोलन घेण्यात आले