Awaj India
Register
Breaking : bolt
चळवळ टिकण्यासाठी एकत्र येणे गरजेचे ; उत्तम कांबळेअण्णा ब्रिगेडचे संस्थापक डॉ.अमोल महापुरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा*पंचगंगा प्रदूषण प्रश्न उद्योजकांची बैठक घेऊन प्रश्न सोडवणार : आबिटकरनदी प्रदूषण प्रश्नी प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा : माणगावेडॉ. डी. वाय. पाटील कृषि महाविद्यालयाच्या* *दोन माजी विद्यार्थ्यांची अन्न व प्रशासन विभागात निवड*डी. वाय पाटील कृषी विद्यापीठाच्या* *13 विद्यार्थ्यांची डी - मार्टमध्ये निवड*डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक टाटा मोटर्स पुणे यांच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न*शिलेदार हायकर्स फाउंडेशनतर्फे मोफत शालेय बँगचे वाटपनदी प्रदूषित करणाऱ्यांच्यावर कारवाई करावीविमानतळ भूसंपादन प्रकियेतील बाधित कुटुंबांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक तातडीने करा;

जाहिरात

 

कोरोना वरील औषध आपल्या शरीरातच

schedule27 Jul 20 person by visibility 1005 categoryआरोग्य


प्राकृतिक चिकित्सकालयाच्या डॉ. देवेंद्र रासकर यांच्या टीप्स
आवाज इंडिया न्यूज, कोल्हापूर
करोना विषाणुवरील औषध अद्याप बाजारात आलेले नाही. बाधा झालेले रुग्ण केवळ त्यांच्यातील प्रतिकारशक्ती (आपल्या शरीरातील स्वंय रोगप्रतिरोधक करणारी ताकत आहे.) वाढल्यानेच बरे झाले आहेत. बऱ्याच लोकांना असे वाटते की, हा आजार एक वेळ सर्वांनाच होणार आहे. ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे तो वाचणार आणि ज्याची कमी त्यांच्या जीवावर बेतणार. याचाच अर्थ आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती हेच करोनावरील औषध आहे.
महामारीतून वाचण्यासाठी प्रतिकारशक्ती कशी वाढवायची आणि कमी कशी होते याबाबत याचा सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.
पावसाळ्यात सर्दी खोकल्याचे विषाणूंना वाढ होण्यास हा काळ पोषक असतो. डेंगी , चिकनगुनिया, मलेरिया हे आजार डासांमार्फत पसरतात‌ विशेषता थंडी वाजून येणे , ताप , अंगदुखी तसेच तापाबरोबर सांधेदुखीचीही लक्षणे दिसू शकतात‌‌. छातीमध्ये कफ, घशामध्ये खव खव होऊ शकते. आपली शरीरयंत्रणा यांना प्रतिरोध करण्यासाठी सक्षम असते. परंतु या परिस्थितीमध्ये मानसिक आरोग्य सांभाळणे खूप आवश्यक असते. या काळात वैयक्तिक स्वच्छता, पोषक आहार आणि सामाजिक आरोग्याचे नियम पाळणे आवश्यक असते.. स्वतःची ऑक्सिजन लेवल वाढवणे आवश्यक आहे. गरजेशिवाय मास्क न वापरणे, रक्तदाब, मधुमेह आणि दमा असणाऱ्या व्यक्तिंनी स्वतःची रोग प्रतिकारशक्ती जास्तीत जास्त वाढवणे आवश्यक आहे. औषधांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आर्सेनिक एल्बम ३० हे होमिओपॅथीक औषध अत्यंत प्रभावी ठरले आहे. आणि त्यांचे कोणतेही साईड इफेक्ट नसल्याचे समोर आले आहे.

- यामुळे वाढते रोग प्रतिकारशक्ती
योगा
व्यायामाचा कोणताही प्रकार
घरी बनवलेलं शुद्ध जेवण
आवळा (कोणत्याही प्रकारे तुम्ही खाऊ शकता)
फळे (कोणतेही एक आंबट फळ)
हिरव्या पालेभाज्या
विविध डाळी
सेंद्रीय गुळ
शुद्ध तेल (कोणतेही रिफाईंड तेल नको)
गुळवेल सत्त्व (गिलोय)
तुळस, हळद
दूध, दही, पनीर इत्यादी.
-प्रतिकारशक्ती कमी करणारे पदार्थ
मैदा (सर्वात जास्त विषारी पदार्थ कोणत्याही स्वरूपात उदाहरणार्थ ब्रेड, नान , बटर , बर्गर , पिझ्झा , जीलेबी, समोसा, कचोरी , पाव पावभाजी अजिबात खाऊ नका )
रिफाईंड तेल (अजिबात खाऊ नका )
साखर अजिबात नको (आयुर्वेदिक गुळ , आयुर्वेदिक साखर, आणि खडीसाखर घेऊ शकता )
बाहेरील कोणतेही जंक फूड खाऊ नका.
मैदा आणि साखरे पासून बनवलेले कोणतेही खाद्य पदार्थ
ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये बनवलेले पदार्थ खाणं बंद करा.
कोल्ड्रिंक वर्ज

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes