Awaj India
Register
Breaking : bolt
राजवर्धन दिनकर यादव यांनी संरक्षण सेवेत घडवला इतिहासअस्मिता धनंजय दिघे : बहुआयामी सामाजिक-राजकीय नेतृत्वाचा प्रेरणादायी प्रवासउत्कृष्ट समाजसेविका मा. राणी मॅडम अंगणवाडी सेविका सौ. रेखा चव्हाण यांचे उत्कृष्ट कार्यम्हासुर्ली (ता. राधानगरी) येथील अंगणवाडी सेविकेचे उल्लेखनीय कार्यबहुजन पत्रकारितेचे चार दशके : प्रा. अंकुश गोविंद वाकडेआदर्श माजी सैनिक रोहित कृष्णदेव कदम यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीयस्वखर्चातून उभारलेले महामाता भिमाई–रामजी आंबेडकर स्मारक सामाजिक बांधिलकीचे प्रतीकसेवेचा व संवेदनशीलतेचा समतोल : सुमेधा प्रभू इंगळे विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी समर्पित कार्य : संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट आणि दक्षिना स्कूलचा प्रेरणादायी प्रवास

जाहिरात

 

एक कोटीच्या जामीनावर सुटलेल्यांनी अमल महाडिक यांच्यावर बोलू नये

schedule10 Feb 24 person by visibility 1480 categoryगुन्हे

*एक कोटीच्या जामीनावर सुटलेल्यांनी अमल महाडिक यांच्यावर बोलू नये - माजी नगरसेवक आशिष ढवळे यांची खरमरीत टीका*
कोल्हापूर ;
          ज्यांचे नेतेच दुसऱ्याचे श्रेय लाटतात त्यांनी टीका करणे म्हणजेच चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टीका भाजपचे माजी नगरसेवक आशिष ढवळे यांनी शारंगधर देशमुख यांच्यावर केली. माजी आमदार अमल महाडिक यांनी पद नसतानाही कोट्यवधींचा निधी मतदारसंघासाठी खेचून आणला याचा पोटशूळ विरोधकांना उठल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 

         केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन आणि अमृत योजनेतील विकास कामांची उद्घाटने सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील हे काका पुतणे करत सुटले आहेत, त्यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी असेही ढवळे यांनी सुनावले. महादेव जानकर हे महायुतीतील नेते आहेत आणि त्यांच्या शिफारसीनुसार मिळालेला हा निधी आहे. उद्घाटने घेऊन या विकासकामांचे श्रेय घेण्याचे काम सतेज पाटलांच्या बगलबच्चांनी करू नये असा इशाराही ढवळे यांनी दिला. 

         सतेज पाटील यांच्या मर्जीतील काही ठेकेदारांनी बेकायदेशीरपणे काही विकास कामे केली आहेत आणि नंतर त्याची निविदा प्रक्रिया राबवली आहे हे उघड झाल्यामुळेच देशमुख यांचा तोल ढासळला आहे. लवकरच यावरही कारवाई होईल आणि सत्य उजेडात येईल असेही ढवळे म्हणाले. केंद्रात आणि राज्यात सत्ता आमची असताना तुम्ही निधी परदेशातून आणता की काय? असा उपरोधिक सवालही ढवळे यांनी केला. 

       आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उच्च न्यायालयात एक कोटी रुपयांच्या जामिनावर सुटलेल्या शारंगधर देशमुख यांनी आपली पातळी ओळखावी असा इशाराही आशिष ढवळे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes