अन.... अशी झाली नग्न पूजा!
schedule19 Jun 23 person by visibility 518 categoryगुन्हे
कोल्हापूर ( आवाज इंडिया प्रतिनिधी)
कोल्हापुरातील 'ती उद्योगी महिला' अनेक वर्ष वेगवेगळ्या क्षेत्रात आपला जम बसविण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी तिने लाखो रुपये वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवायला सुरुवात केलेली आहे. सर्व क्षेत्रात आपला दबदबा निर्माण व्हावा यासाठी गेली तीन ते चार वर्षे ती प्रयत्न करत आहे. यासाठी तिने प्रत्येक उद्योगांमध्ये आठ ते दहा कर्मचारी कामावर ठेवलेले आहेत. येईल त्याला काम देऊन आपण खूप मोठी उद्योजिका आहे असं ती बसवण्याचा प्रयत्न करीत आहे. या महिलेला कोणत्याच उद्योगात यश येत नसल्याने ती अनेक वेळा डिप्रेशनमध्येही गेलेली आहे. अशातच चार महिन्यांपूर्वी अचानक तिच्यासमोर हा 'भोंदूबाबा' प्रकट झाला. आणि इथून सुरू झालं आघोरी पूजेचे सत्र....
*तिला मिळाला भोंदू बाबाचा आधार!*
एका नातेवाईकाच्या मार्फत ही महिला भोंदू बाबाच्या संपर्कात आली. आपण खूप ज्ञानी असून आपण केंद्रीय मंत्र्यांपर्यंतच्या लोकांच्या समस्या सोडवल्याच्या भूलथापा त्याने मारल्या, तसेच त्यांना त्यांच्या उद्योगात आर्थिक मदत दिल्याच्या थापा मारत या महिलेला आपल्या जाळ्यात ओढलं आहे. घरातील अनेक समस्या आणि थाटलेल्या उद्योगात यश येत नसल्याने त्या महिलेने अखेर भोंदूबाबाचे पाय धरले. बाबाने मारलेला खडा अगदी योग्य ठिकाणी लागल्याने बाबाच्या चेहऱ्यावर हासू फुलले. 21 अमावस्येला *नग्न पूजा* केल्यास तुमच्या घरातील, उद्योगातील आणि शरीरात घुसलेल्या वाईट शक्ती निघून जातील असं बाबने या महिलेच्या डोक्यात भरवले. बाबा सांगेल त्या गोष्टीला या महिलेने मग आपला सूर मिळवण्यास सुरुवात केली.
*अमावस्याच्या आदल्या दिवशी झाली पहिल्या नग्न पूजेची तयारी*
चार महिन्यांपूर्वी भोंदूबाबाने कोल्हापुरात प्रवेश केला. कोल्हापुरातली *पहिली नग्न पूजा* ही अमावस्या दिवशी करायची ठरली.भोंदू बाबांने सांगितल्या प्रमाणे तिने पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य कोल्हापूर पालते घालून गोळा केले. पूजेसाठी लागणाऱ्या ज्या वस्तू मिळाल्या नाहीत त्या सांगली वरून मागवण्यात आल्या. या भोंदू बाबांने पूजे अगोदरच 4 दिवसांपासूनच या महिलेच्या घरी आपले बस्थान मांडले. दिवस रात्र तिच्या मनात अघोरी आणि नग्न पूजेचं भूत घातले. त्यानंतर या महिलेचा स्वभावात बदल घडू लागला. स्वतःच्याच कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर ती संशय घेऊ लागली. आणि इथंच या भोंदू बाबाचा पहिला यशस्वी बाण बसला.
*पूजेदरम्यान करणार पूर्णांगाला स्पर्श*
अमावस्या दरम्यान करण्यात येणारी पूजा ही लाभदायक आहे. ही पूजा केल्याने तुझ्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील. भरभराट होईल असे आमिष या भोंदू बाबाने या महिलेला दाखवले. पूजा करण्या अगोदर याबाबाने काही अटी घातल्या. ही *पूजा पूर्ण नग्न* पूजा असेल, संपूर्ण शरीराची पूजा असल्याने शरीराच्या *प्रत्येक भागाला स्पर्श करणार.* आणि यो... वाटे शरीरात प्रवेश केलेल्या सगळ्या दृष्ट शक्ती बाहेर काढणार. अश्या थापा या भोंदूबाबने मारल्या. या सर्व अटी मान्य करून ही महिला नग्न पूजेला तयार झाली.
क्रमशः
अमावस्याच्या रात्री आलिशान फ्लॅटमध्ये झाली नग्न पूजा
पूजे दरम्यान झाला ....हा प्रकार
आजच्या अमावस्येला होणार तिसरी नग्न पूजा