जिल्हा परिषद वार्षिक क्रीडा महोत्सव अंतर्गत बुध्दीबळ स्पर्धा उत्साहात
schedule05 Feb 25 person by visibility 155 categoryशैक्षणिक
कोल्हापूर :- जिल्हा परिषद कोल्हापूर कडील दरवर्षी प्रमाणे यावर्षीही अधिकारी व कर्मचारी यांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेस प्रारंभ झाला. दिनांक 05 फेब्रुवारी, 2025 रोजी वसंतराव नाईक सभागृह जिल्हा परिषद कोल्हापूर येथे बुध्दीबळ स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेचे उदघाटन अति. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्या शुभ हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले. यास्पर्धेमध्ये नियमीत महिला,पुरुष कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी यांच्या बुध्दीबळ स्पर्धा संपन्न झाल्या. त्यामध्ये नियमित कर्मचारी यांचे 18 ते 35, 36 ते 45 व 46 ते 60 असे तीन वयोगट नुसार स्पर्धा घेण्यात आल्या व कंत्राटी कर्मचारी यांचा खुला गट खेळविणेत आला. सर्व गटात मिळून जवळजवळ 180 कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते.
त्यामध्ये पुरुष 18 ते 35 या वयोगटामध्ये असिफ सय्यद प्रथम, वैभद गुट्टे व्दितीय व चिंतामणी कारजगे नी तृतीय क्रमांक पटकविला. 36 ते 45 या वयोगटामध्ये सचिन माने प्रथम, विनायक सुतार व्दितीय व मुरलीधर कुंभार नी तृतीय क्रमांक पटकविला. 46 ते 60 या वयोगटमध्ये सुभाष भोसले प्रथम, प्रशांत गायकवाड व्दितीय व सुनिल व्हटकर नी तृतीय क्रमांक पटकविला,
महिला गटामध्ये 18 ते 35 वयोगट समिक्षा पाटील प्रथम, तेजस्विनी टिपुगडे व्दितीय, दिक्षा ओहळानी तृतीय क्रमांक पटकविला. वयोगट 36 ते 45 मध्ये सुप्रिया घोरपडे प्रथम, राजश्री काकतकर व्दितीय व मनिषा कांबळेनी तृतीय क्रमांक पटकविला. वयोगट 46 ते 60 मध्ये मनिषा देसाई प्रथम, शुभांगी कार्वेकर व्दितीय व अर्चना खाडेनी तृतीय क्रमांक पटकविला.
त्यानंतर कंत्राटी पुरुष मध्ये राहूल जावडे प्रथम, शरद जाधव व्दितीय तर गजानन कुलकर्णी नी तृतीय क्रमांक पटकविला. कंत्राटी महिला कर्मचारी मध्ये सायली पाटील प्रथम, संमृध्दी पाटील व्दितीय, कविता माळीनी तृतीय क्रमांक पटकविला. कर्मचारी बरोबर अधिकारी यांनीही या खेळाचा आनंद घेतला.
आतंरराष्ट्रीय पंच श्री भरत चौगुले व राष्ट्रीय पंच मनिष मारुलकर व आरती मोदी यांनी काम पाहिले. या बुध्दीबळ स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन प्रसाद बोरकर, प्रज्योत कुंभार, सुशांत सुर्यवंशी , स्वप्नील पाटील, अदित्य पोवार व सागर जाधव यांनी केले .
यानंतर 10 फेब्रुवारी रोजी सायकल व दिनांक 11 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी अखेर व्हॉली बॉल पुरुष स्पर्धा होणार आहेत.