Awaj India
Register
Breaking : bolt
कोचिंग क्लासेसवरील जाचक अटी कमी करा; सर्वसामान्य संचालकांना दिलासा द्या – बी. एस. पाटीलचुयेच्या सक्षम नारिंगकर याचा अटकेपार झेंडा कोल्हापूर वनविभागात फिंगर जॉईंट मशीनचालक पदासाठी भरती* जिल्हा परिषद लिपिक कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी अजितबाबू मगदूम यांची निवड भावी शिक्षकांची 44 लाखांची फसवणूककोल्हापुरात 'पंचशील वधू-वर सूचक केंद्र'ची सुरुवात; विवाह इच्छुकांसाठी विश्वासार्ह व्यासपीठमहालक्ष्मी सहकारी दूध संस्थेच्या फेरलेखापरीक्षणाचे आदेश;कोल्हापुरात बिल्डरकडे १ कोटींची खंडणी मागून अपहरण; ५ जणांवर गुन्हा दाखलडॉ. संजय डी. पाटील यांना* *डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार प्रदान*भाजपचे किती ठरावधारक आहेत : बाबासाहेब पाटील यांचा आक्रमक सवाल

जाहिरात

 

भोंदू बाबाने घेतला धसका ; बाबाचा झाला सर

schedule10 Jul 23 person by visibility 815 categoryगुन्हे


कोल्हापूर (आवाज इंडिया)
कोल्हापुरातील 'त्या' महिलेच्या मागून कोल्हापुरात घुसलेल्या 'त्या' भोंदू बाबाचे अनेक किस्से सध्या समोर येत आहेत. आवाज इंडियाने 'बाबाने केली महिलांची नग्न पूजा' ही मालिका लावली आणि या अघोरी पूजेचा भांडा फोड केला. ही महिला कोण ? हा भोंदूबाबा कोण ? अशी विचारणा आमच्या कडे हजारो वाचकांनी केली आहे. ही वृत्तमालिक प्रदर्शीत होताच या भोंदूबाबच्या पाया खालची जमीन हादरली आहे. आपला भांडाफोड होणार या भीतीवर त्याने आपली ओळखच बदललेली आहे.


*भोंदूबाबाचा झाला सर*


आवाज इंडियाने ही मालिका लावून धरल्याने या भोंदूबाबने आपली ओळख बदलण्याचा प्रयत्न केला. त्या महिलेच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना त्याबाबने चांगलाच दम भरलेला आहे. इथून पुढे आपणाला बाबा म्हणायचे नाही, तर सगळ्यांनी आपणाला *सर* म्हणाचे असा फर्मान काढला आहे. चुकून जरी कोणी त्याला बाबा असं म्हणाले तर तो त्या कर्मचाऱ्यांवर डोळे वठारतो. या पूर्वी दररोज कोल्हापुरातील मध्यवस्तीत असणाऱ्या कार्यालयात येणाऱ्या बाबाने आता हळूहळू येणं कमी केले आहे. आता तो आठवड्यातून 2 किंवा 3 दिवसातून येऊन धिंगाणा घालत आहे. 


*भोंदूबाबाकी जुलफे आणि टिळा*


सांगलीतील भोंदूबाबने कोल्हापुरात चांगलाच जम बसवलेला आहे. एका आलिशान फ्लॅट मध्ये त्याच्या विश्रांतीची सोया करण्यात आली आहे. या भोंदूबाबाकडे पाहिलं तर चुरगळलेली कपडे, माथ्यावर टिळा, हातात अनेक गंडेदोरे तर सुनेहरी जुलफे आहेत. यावरून त्याचं खरं रूप कळतं, मात्र त्याच्या आहारी गेलेल्या त्या महिलांना तो चक्क देवाचा अवतार वाटतो.


*कर्मचाऱ्यांना भरवला जबरदस्तीने प्रसाद*


सत्यनारायण पूजेच्या नावाखाली शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सध्या एक विशीष्ट प्रकारचा प्रसाद देण्यात येत आहे. सत्यनारायण पूजा वर्षांतून एकदाच करतात. मात्र या कार्यालयात प्रत्येक महिन्याला पूजेच्या नावाखाली हा भोंदूबाबा त्या महिलेकडून त्या कर्मचाऱ्यांना प्रसाद वाटते. अनेक कर्मचाऱ्यांना या प्रसादा विषयी संशय आल्याने त्यांनी हा प्रसाद खाण्यास टाळाटाळ करत आहेत. काही जण तर तो प्रसाद खाण्याचं नाटक करतात आणि बाहेर जाऊन तो एक कोपऱ्यात फेकून देत आहे. भोंदूबाबने दिलेला हा प्रसाद जर कर्मचाऱ्यांनी खाल्ला तर ते कर्मचारी आपल्या मुठीत राहतील असा समज त्या महिलेचा आहे.


क्रमशः

त्या बंटी, बबली आणि भोंदूबाबाचा त्रिकोण


जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes