Awaj India
Register
Breaking : bolt
सोलापुरात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात; शिक्षक संघटना आणि शिक्षक नेत्यांचा भक्कम पाठिंबा!*शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांना पसंतीक्रमांक १ चे मत देऊन विजयी करा!स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीची ताकद*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनकुर्डूवाडी-माढा परिसरात शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!*सीएचबी प्राध्यापकांच्या प्रश्नांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार: शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे*मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री मुश्रीफ यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही तुमचा आमच्यावर विश्वास नाही का?आम्ही शपथ घेणारच नाही”*पहिल्या फेरीतच कौस्तुभ गावडे यांना विजयी करणार; शिक्षक नेते दादासो लाड यांची स्पष्टोक्ती*शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करणारच: शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांची स्पष्ट भूमिका*

जाहिरात

 

लॉकडाऊनमुळे दोन आठवडे प्रवासी पास बंद

schedule18 Jul 20 person by visibility 4252 categoryलाइफस्टाइल

लॉकडाऊनमुळे दोन आठवडे प्रवासी पास बंद
: जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पाठविली सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रे
आवाज इंडिया न्यूज
कोल्हापूर-(प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सोमवारपासून कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येण्यासाठी दिले जाणारे सर्व प्रवासी पास दोन आठवडे बंद ठेवावेत, असे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त यांना शनिवारी पाठविली आहेत.
राज्याच्या विविध भागात अडकलेल्या प्रवासी, विद्यार्थी, कामगार, आदींना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्याकडून परवाने दिले जातात. सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात सोमवार(दि.२१)पासून सात दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातून कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी दैनंदिन किंवा कोणत्याही स्वरूपाचे प्रवासी पास देण्यात येऊ नयेत. केवळ तातडीची वैद्यकीय सुविधा, मालवाहतूक व अत्यावश्यक सेवांना सूट राहील. अशी विनंती या पत्राद्वारे जिल्हाधिकारी देसाई यांनी केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes