+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustजिल्हा परिषदेमार्फत 'गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रम* adjustहिंदू देव देवितांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन adjustहुकुमशाही विषवल्ली तोडून टाकण्यासाठी नारीशक्ती एक व्हा आणि शाहूंना विजयी करा adjustखतीजा शकील मेस्त्री राज्यात पहिली adjustजनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी शाहू महाराजांना निवडून द्या adjustनिगवे येथे शाहू छत्रपतींनी साधला संवाद adjustमाजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी दिला शाहू महाराजांना शब्द adjustदेशात भाजपचा हुकूमशाही कारभार ;सौरभ खेडेकर यांची टीका adjustशाहू छत्रपती यांची रंगपंचमी; संभाजी राजे यांची जूनची हमी adjustगोकुळ’ च्या कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन संघाच्या आणि दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी काम करावे
schedule01 Mar 24 person by visibility 37 categoryराजकीय
आपली ताकद बघा आणि मग जागा बघा असे प्रकाश आंबेडकर का म्हणत आहेत

मुंबई (प्रशांत चुयेकर)
भाजपच्या विरोधात मोठी ताकद उभा करण्यासाठी देशात इंडिया indiaआघाडी स्थापन झाली आहे. महाराष्ट्रात ही हाच फॉर्मुला घेत महाविकास आघाडीच्यावतीने भाजपला टक्कर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर पूर्वी इतक्याच लोकसभेच्या जागा मागणं योग्य आहे का असा सवाल प्रकाश आंबेडकर prakashambedkar यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेना, shivasena राष्ट्रवादी rashtravadi  पक्ष फुटल्यानंतर पक्षाची बरीच हानी झालेली आहे. प्रमुख पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते हे भाजपला जाऊन मिळाल्याने आता आपल्याजवळ काय आहे. फुटलेल्या पक्षात किती लोक आहेत हे बघूनच जागा वाटप करावे, असे प्रकाश आंबेडकर यांना वाटते.
वंचितने स्वतःच्या बळावर लोकसभा lokasabha आणि विधानसभा vidhansabha निवडणुका लढवलेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी 41 लाख 32000 पेक्षा अधिकि मतदान त्यांनी घेतलेलं आहे.औरंगाबाद एक अकोला दोन तर 41 लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानी वंचितन मते घेतले आहेत.
विधानसभा निवडणुकीत 24 लाखापेक्षा अधिक मतदान त्यांनी घेतलेला आहे.दहा मतदारसंघात दोन नंबरला त्यांचे उमेदवार आहेत.काही मतदारसंघात तिसऱ्या ठिकाणी उमेदवार आहेत.
स्वतःच्या जीवावर हा प्रयोग त्यांनी पूर्ण केला आहे त्यामुळे साहजिकच आता आपल्याला त्या मतानुसार जागा हव्यात त्यानुसार जागावाटप व्हावे अशी ही मागणी आंबेडकर करत आहेत.
कोणाकडे किती लोक आहेत असं बघूनच लोकसभेच्या जागावाटप करावं असेही प्रकाश आंबेडकर यांना वाटते.दोन वेळच्या निवडणुकीत त्यांनी मताधिक्य अधिक घेतल्या कारणाने त्यांचा दावा करणे हे बरोबर असल्याचेही कार्यकर्त्यांच्या मधून बोलले जात आहे.