+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustछत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा काढला हा अपमान नाही काय? : राजेश क्षीरसागर adjustशाहू महाराजांना विजयी करून कोल्हापूरचे समतावादी विचार सिद्ध करा adjustशेतकऱ्यांचे प्रश्न दिल्लीत मांडण्यासाठी शाहू महाराजच खासदार आवश्यक : आ. पी. एन. पाटील adjustसरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी प्रचंड अस्वस्थ? : संभाजीराजे छत्रपती adjustसंजय मंडलिक विधानसभेला मुश्रीफ की समरजितराजे सोबत राहणार ? adjust गडहिंग्लज एमआयडीसीसाठी प्रयत्नशील राहू adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये* *फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी* adjustमहाराज जरा लक्ष ठेवा, नाहीतर वटमुखत्यार वाड्यावर नाव लावतील adjustचेतन’ यांचे व्हीजन घेऊनच कोल्हापूरचा विकास करणार ; शाहू छत्रपती adjustपोर्ले येथे सभेत सत्यजित पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन
schedule06 Jan 24 person by visibility 172 categoryलाइफस्टाइल

कोल्हापूर :
स्त्रियांना समान हक्क मिळण्यासाठी फुले आंबेडकर विचार पुढे नेऊ शकतो. महिलांच्या शौर्यगाथाचा इतिहास समोर ठेवूनच फुले आंबेडकर यांनी महिलांना समान हक्क देण्याचा प्रयत्न केला असेे प्रतिपादन डॉक्टर धम्म संगिनी रामगोरख यांनी केला.

धमसंघ संचलित संघमित्रा संघ कोल्हापूर यांच्या वतीने
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व डॉ. भदन्त आनंद कौसल्यायन संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित धम्मदेसनामध्ये स्त्री मुक्तीचा फुले आंबेडकरी दृष्टिकोन या विषयावर त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी धम्म संघाचे अध्यक्ष प्रा अशोक चौकाकडे होते.
 डॉक्टर संगमित्रा रमा गोरख म्हणाल्या स्त्रियांची मुक्ती ही आपल्या मातीतूनच झालेली आहे. याचा संदर्भ जगभराच्या इतिहासकारांनी घ्यावा. बौद्ध काळापूर्वीही स्त्रियांच्या शौर्यगाथा सांगितल्या जातात. आपण सुरांचे वंशज आहोत यासाठी आपण त्यांच्या संदर्भ देतो त्या ठिकाणी भेटी देतो. याची जाणीव सर्वांनी ठेवावी व स्त्रियांनी आपली मुक्ती करून घ्यावी.
 बाबासाहेब आणि फुले यांनी हेच संदर्भ देत स्त्रियांना मुक्ती देण्याचे काम केलं. फुले यांनी स्त्रियांचे शिक्षण पुनर्विवाह यासारख्या गोष्टी करत स्त्रियांनामान हक्क दिला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून स्त्रियांना समान हक्काचा कायदा केला.
यावेळी प्रज्ञा सचिन कपूर, प्रणाली अशोक चोकाककर मंगलांनाकांबळे उपस्थित होते.
सरिता महाबोधी पद्माकर यांनी सूत्रसंचालन केले