+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustविकास कामाच्या 'ऋतू' मध्ये निधीचा 'अमल' न झाल्याची टीका adjustशाहुवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात विनय कोरे यांची डोकेदुखी वाढणार adjustशाही दसरा महोत्सवानिमित्त शुक्रवारी पारंपरिक वेशभूषा दिवस* adjustपुढील पाच वर्षात आणखी जोमाने काम करणार : आ. जयश्री जाधव adjustलोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी शुक्रवारपासून *दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर* adjustहळदी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बाजीराव चौगले adjustराज्यातील गरजूंपर्यंत प्रबोधनातून शासकीय योजनाही पोहोचवाव्यात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* adjustकिरण लोहार यांचा सन्मान adjustमहात्मा गांधीजी जयंती निमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजुषा adjust नागपूरच्या महिला दूध उत्पादकांची ‘गोकुळ’ ला भेट...
schedule27 Sep 24 person by visibility 95 categoryलाइफस्टाइल

कोल्‍हापूर,ता.२७: नागपूर जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभाग यांच्यावतीने जिल्हा परिषद सेस फंड योजनेंतर्गत नागपूर येथील १०० महिला दूध उत्पादक शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी आले असता त्यांनी आज कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) मुख्य दुग्ध प्रकल्पास गोकुळ शिरगाव येथे भेट दिली.

          यावेळी त्यांनी गोकुळच्या मुख्य प्रकल्पास भेट देऊन तेथील व्यवस्थापन, संकलन, प्रक्रिया, उत्पादन, पॅकिंग याची पाहणी केली. या पाहणी दरम्यान, गोकुळ दूध संघाचे व्‍यवस्‍थापन व कामाची पद्धत पाहून महिला शेतकरी भारावून गेल्या. गोकुळमार्फत दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा, दूध खरेदी दर याची सविस्तर माहिती देण्यात आली. अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या महिला दूध उत्पादक शेतकरी यांनी गोकुळ राबवित असलेल्या दूध उत्पादकांच्या हिताच्या अनेक योजनेचे व खास करून जनावरांच्या वरील आयुर्वेदिक उपचार पद्धतीचे त्यांनी कौतुक करून गोकुळने आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेली प्रगती दूध उत्पादकांच्या उत्कर्षाला चालना देणारी असल्याचे हे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

          यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या महिला शेतकऱ्यांचे स्वागत केले व दुग्ध व्यवसायाविषयी चे सखोल मार्गदर्शन गोकुळ निश्चितच करेल असे आश्वासन दिले.

यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक किसन चौगले, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, महिला नेतृत्व विकास अधिकारी नीता कामत, जिल्हा परिषद नागपूर कृषी व पशुसंवर्धनचे सभापती प्रविण जोध, पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रवीण नागरगोजे, पशुधन विकास अधिकारी डॉ.शकील अगवान, डॉ. राधा भोईटे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम, महिला अधिकारी गीता उत्तुरकर, तृप्ती मदने व दूध उत्पादक महिला व संघाचे अधिकारी उपस्थित होते.