+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule28 Sep 22 person by visibility 323 categoryसामाजिक

बुधवार 28 सप्टेंबर 2022


अवनि संस्थेमार्फत मानसिक आजारी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत सर्व्हे दरम्यान कळंबा ग्रामपंचायत समोर एक पिडीत बेघर पुरुष आढळून आला असता त्याची चौकशी केली. या पुरुषाच्या उजव्या पायाला खूप मोठी जखम झाली होती व जखमे मुळे पायाचे मधले बोट कट होत असल्याने त्याला चालता ही येत नव्हते. ही गोष्ट अवनि संस्थेचे कार्यकर्ते अक्षय पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर सदर बेघरास कळंबा गावचे सरपंच मा. सागर भोगम ग्रामसेवक दिलीप तेलवी तलाठी पुरुषोत्तम ठाकूर 
क्लार्क विशाल सोनुले व अमोल पाटील कर्मचारी यांच्या मदतीने 108 ऍम्ब्युलन्सच्या माध्यमातून सदर बेघर पुरुषास सी. पी. आर. मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या औषधोपचार सुरु असून उपचार पूर्ण झाल्यानंतर संस्थेमार्फत पाठपुरावा करून सदर इसमाचे पुढील पुनर्वसन करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया अवनि संस्थेच्या अध्यक्षा मा. अनुराधा भोसले व उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय पाटील यांनी पूर्ण केली. यावेळी पुष्पा कांबळे व विशाल पिंपळे यांची मदत झाली.