-आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम
कोल्हापूर
कोल्हापूर दक्षिणेचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन रोजगार अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विविध कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा रविवारी समारोप झाला. डॉ. डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, साळुंखे नगर कॅम्पस येथील कोल्हापूर इनक्युबेशन सेंटर येथे या कार्यक्रमांतर्गत ब्युटी थेरपीस्ट, सेल्फ एम्प्लॉइड टेलर आणि इनमिटेशन ज्वेलरी यांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला.
डॉ.डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरेश माने व अन्य मान्यवरांच्या हस्ते या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्या तसेच विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या महिलांचा सत्कार करून त्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
डॉ. माने म्हणाले, युवक-युवती आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना रोजगार निर्मितीसाठी कौशल्ये प्रदान करण्याच्या उद्देशाने आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून व आमदार पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 'मिशन रोजगार' उपक्रम राबवण्यात येतो. या प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत असून त्या आत्मनिर्भर बनून स्वतःचे जीवनमान उंचावू शकतात.
यावेळी कॅम्पस डायरेक्टर डॉ. अभिजीत माने, राजन डांगरे, समीना जमादार, यास्मिन मोमीन, प्रियंका मोहिते, दिपाली देसाई, तसेच सर्व प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिला उपस्थित होत्या.