गांधीनगर परिसरातील कोरोना रुग्णसंख्या 237
schedule26 Jul 20 person by visibility 1005 categoryआरोग्य
गांधीनगर परिसरातील कोरोना रुग्णसंख्या 237
कोल्हापूर
( विशाल फुले )
गांधीनगर परिसरातील पाच गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी दहाने वाढली असून ती 237 वर पोहोचली आहे. सतत वाढणाऱ्या रुग्णांमुळे गांधीनगर परिसरात भीतीचे सावट गडद झाले आहेत.
वळीवडे येथील रुग्णसंख्या स्थिर असून उचगावमध्ये संसर्गाची साखळी वेगाने वाढत आहे. उचगावपैकी शांतीनगरमध्ये रविवारी दोन रुग्ण आढळून आले. हे दोन रुग्ण कोरोनाने बळी गेलेल्या शासकीय कर्मचाऱ्याची मुले आहेत. गांधीनगरमध्ये दोन रुग्णांचा पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. गांधिनगर बाजारपेठपैकी गडमुडशिंगी हद्दीमध्ये एक रुग्ण मिळून आला आहे. चिंचवाडमधील रुग्णसंख्या पाचने वाढली आहे.
गांधीनगर परिसरातील गाववार कोरोना रुग्णांची रविवार अखेरची संख्या अशी – गांधीनगर (100), वळिवडे (59), उचगाव (46), गडमुडशिंगी (18), चिंचवाड (14). याप्रमाणे गांधीनगर परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 237 वर पोहोचली आहे. आजअखेर मृतांची संख्या पाच आहे.