+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustविशाल अनिल आवडे यांना पुरस्कार adjustउद्योगजकांशी सरंक्षण क्षेत्रातील संधीबाबत जनरल विनोद खंदारे यांचे मार्गदर्शन adjustविकास कामाच्या 'ऋतू' मध्ये निधीचा 'अमल' न झाल्याची टीका adjustशाहुवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात विनय कोरे यांची डोकेदुखी वाढणार adjustशाही दसरा महोत्सवानिमित्त शुक्रवारी पारंपरिक वेशभूषा दिवस* adjustपुढील पाच वर्षात आणखी जोमाने काम करणार : आ. जयश्री जाधव adjustलोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी शुक्रवारपासून *दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर* adjustहळदी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बाजीराव चौगले adjustराज्यातील गरजूंपर्यंत प्रबोधनातून शासकीय योजनाही पोहोचवाव्यात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* adjustकिरण लोहार यांचा सन्मान
schedule30 Mar 24 person by visibility 168 categoryउद्योग

‘गोकुळ’ च्या कर्मचाऱ्यांनी दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी काम करावे  -अरुण डोंगळे


अरविंद जोशी यांचा गाय दूध अनुदानातील उल्लेखनीय कामकाजाबद्दल सत्कार 

 
कोल्हापूर : 

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या., कोल्‍हापूर (गोकुळ) च्या संगणक विभागाचे व्यवस्थापक श्री.अरविंद नारायण जोशी यांनी शासनाच्या प्रतिलिटर ५ रु.गाय दूध अनुदान योजनेचे काम अतिशय चागंल्या पद्धतीने कमी वेळेत पूर्ण केलेबद्दल गोकुळच्या वतीने त्यांचा सत्कार संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांचे हस्‍ते व सर्व संचालक मंडळाच्‍या उपस्थित गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे करण्‍यात आला.

          यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळ सलंग्न दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर लवकरच रु.११ कोटी ३२ लाख ४९ हजार ८३५ इतके अनुदान जमा होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अनुदान मिळवणारा गोकुळ हा राज्यातील प्रथम क्रमांकाचा संघ असून दूध उत्पादकांना हे अनुदान मिळवून देण्यासाठी संगणक, संकलन व पशुसंवर्धन या विभागांनी झोकून देऊन काम केले, याच पद्धतीने संघातील सर्वच कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन संघाच्या आणि दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी काम करावे आणि प्रत्येकाचा सत्कार असा संचालक मंडळामध्ये व्हावा. यावेळी संगणक, संकलन व पशुसंवर्धन या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या कामगीरीचे चेअरमन डोंगळे यांनी कौतुक केले.

          राज्यातील गाईचे दूध दर कोसळल्यानंतर गाय दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने गाय दूध खरेदीसाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान योजना जाहीर केली, ही अनुदान योजना जाहीर केल्यानंतर त्यामध्ये घातलेल्या जाचक नियम व अटीमुळे अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत महाराष्ट्रातील अगदी मोजक्या दूध संघांना आणि त्यापैकी अगदी फार कमी दूध उत्पादकांना या अनुदान योजनेचा लाभ मिळालेला आहे. याबद्दल सगळीकडेच दूध उत्पादकातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना अशा परिस्थितीत गोकुळने या दूध अनुदान योजनेमध्ये चांगल्या पद्धतीने काम करून जवळपास रुपये ११ कोटी ३२ लाख इतके अनुदान दूध उत्पादकांना मिळेल अशी माहिती शासनाकडे अपलोड केलेली आहे. यासाठी संघाच्या संगणक विभागाचे व्यवस्थापक अरविंद जोशी आणि त्यांच्या टीमने गोकुळचे एक स्वतंत्र मोबाईल ॲप बनवून त्यामध्ये डाटा अपलोड करण्याची सुविधा दूध संस्थांना उपलब्ध करून दिली. त्यामुळे जास्तीत जास्त दूध उत्पादकांचा डाटा विहित वेळेत संघाकडे एकत्रित करणे व तपासून शासनाकडे पाठवणे शक्य झाले. त्यासोबतच गोकुळने २०१७ सालापासून पशुवैद्यकीय सेवेसाठी इनाफ हि संगणक प्रणाली वापरल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी दूध उत्पादकांची व त्यांच्या जनावरांची नोंदणी भारत पशुधन ॲप मध्ये असल्याने त्याचा देखील फायदा झाला. त्यामुळे संघाला सदरचे अनुदान प्राप्त करणे शक्य झाले.

याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, जेष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ. शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.