एस. आर. पी. एफ. ग्रुप 16 कोल्हापूर येथे वृक्षारोपण
schedule16 Aug 24 person by visibility 756 categoryसामाजिक
 
        
            *एस आर पी एफ ग्रुप 16 कोल्हापूर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षारोपण*
        कोल्हापूर ;
                पोलीस अधीक्षक तथा समादेशक नम्रता पाटील मॅडम यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम *'वृक्षारोपण ही आजच्या काळाची गरज '* या दूरदृष्टी विचारातून एस आर पी एफ ग्रुप 16 कोल्हापूर कॅम्प नंदवाळ  येथे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.विविध प्रकारच्या 300 वृक्षांचे वृक्षारोपण पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मार्फत होत आहे.
         आज पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत असून समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही भविष्य काळाची गरज आहे.वृक्षारोपण कार्यक्रमाकरिता सहा. समा. सदानंद सदांशिव, सहा. समा. हिंगरूपे, पोनि लिपारे, पोनि तांदळे, पोउपनि गेंगजे,  साळुंखे, वारंग व पोलीस अंमलदार उपस्थित होते. पूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पीएसआय अशोक गुजर यांनी केले व सर्वांचे आभार व्यक्त केले.
 
                     
                    