Awaj India
Register
Breaking : bolt
डॉ.डी वाय पाटील पॉलिटेक्निक मध्ये बजाज कंपनीच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न डॉ. सुनील जे. रायकर यांचे 3डी प्रिंटिंगवर व्याख्यानचंदगड तालुक्यात विहिरीचे पैसे पाण्यातहोय, मी भांडी घासतोय!पोपट पवार,सर्जेराव नावले,शेखर पाटील,आदित्य वेल्हाळ,सचिन सावंत, नयन यादवाड यांना कोल्हापूर प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीरडॉ. कोडोलीकर यांना धम्मविचार साहित्य गौरव पुरस्कार जाहीरडी. वाय. पाटील विद्यापीठात* *सावित्रीबाई फुले यांना अभिवादन*सबका मंगल हो रूपाली पाटीलडी. वाय. पाटील मेडिकल संघाला विजेतेपदसतेज कृषी प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी तुफान तुडुंब गर्दी*

जाहिरात

 

श्री दत्तात्रय वारे गुरुजी यांनी यंदाचा 'सावली पुरस्कार' जाहीर

schedule24 Nov 23 person by visibility 298 categoryसामाजिक

कोल्हापूर : आवाज इंडिया

कोल्हापूरमधील सावली केअर सेंटरच्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रात ध्येयवेड्या पद्धतीने • काम करणाऱ्या सेवाव्रतीला देण्यात येणारा २०२३ चा 'सावली पुरस्कार' शिक्षण क्षेत्रात चमत्कार घडवणाऱ्या श्री दत्तात्रय वारे गुरुजींना देण्याचा निर्णय सावलीच्या निवड समितीने घेतला आहे.

भारतातील मध्यमं वर्गाच्या मागील काही वर्षांपासून उंचावत गेलेल्या आर्थिक स्तरामूळे मध्यमवर्गीयांमध्ये आपल्या पाल्यांना महागड्या /इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये दाखल करण्याकडे कल दिसून येतो. किंबहूना जास्तीत जास्त महाग शाळेमध्ये मुलांना दाखल करणे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाऊ लागले आहे. यामूळे मराठी माध्यमांच्या शाळा हळूहळू ओस पडू लागल्या आहेत. त्यातही जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये मुलाना दाखल करणे बऱ्याच पालकांना शरमेचे वाटू लागले आहे. अगदी अनिवार्य परिस्थितीमध्येच पालक आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद वा महानगरपालिकांच्या शाळेमध्ये दाखल करतात.

दुसऱ्या बाजूला शासनाच्या अनास्थेमुळेही शाळांच्या इमारतींची अवस्था बिकट व्हायला लागली आहे. गळक्या वर्गखोल्या, अपुरी / अस्वच्छ प्रसाधनगृहे, तुटक्या खिडक्या, दरवाजे अशा अनेक कारणांमूळे या शाळांमध्ये मुलांची संख्या रोडावू लागली. मुलांची संख्या कमी झाल्यामूळे व्यवस्थापन शिक्षकांची संख्या कमी करु लागले. यामूळे गरीब कुटुंबातील मुलांची फारच अबाळ होऊ लागली. ज्यांना फी देऊन शिक्षण घेणे परवडत नाही अशा मुलांना अत्यंत दयनीय अवस्थेतील शाळांमध्ये शिकणे भाग पडत आहे.

वारे गुरुजी पुणे जिल्हा परिषदेच्या वाबळेवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक • म्हणून रुजू झाले. वाबळेवाडीच्या शाळेची अवस्थाही काही वेगळी नव्हती. वारे गुरुजींना जिल्हा परिषदांच्या शाळांची ही दुरावस्था अस्वस्थ करत होती. आणि बघता बघता वारे गुरुजींनी वाबळेवाडी ग्रामस्थ, राज्य शासन, सि.एस.आर. फंड आणि एकंदरीत सर्व समाज यांच्या मदतीने न केवळ शाळेचे बाह्यरूप पालटून टाकले तर शाळेचा शैक्षणिक दर्जाही अव्वल करण्यात यश मिळवले. त्यांच्या सहकारी शिक्षकांचेही त्यांना मनापासून सहकार्य लाभले.

अधुनीक सुखसोयींनी युक्त, पर्यावरण पुरक इमारती, नेत्रसुखद परिसर, वैशिष्ठ्यपुर्ण बैठकव्यवस्था अशा अनेक कारणांनी वाबळेवाडी शाळेला आंतरराष्ट्रीय मानांकन मिळाले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेला हा मान मिळणारी ती पहिली शाळा ठरली आहे. नुसती इनारतच नव्हे तर शैक्षणिक खात्याने दिलेल्या चौकटीत राहूनही त्यांनी अध्यापन पद्धत, शिक्षक-विद्यार्थी-पालक संबंध, विविध माध्यमांचा चपखल वापर अशा अनेक गोष्टींमध्ये अमुलाग्र बदल करत शैक्षणिक दर्जा उंचावला आहे.

अभिमानाची गोष्ट म्हणजे आज जिल्हा परिषदेच्या या शाळेमध्ये ७५० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर नविन अॅडमिशनसाठी वेटींग लिस्ट लागली आहे.
काही राजकिय आरोप-प्रत्यारोपांनंतर त्यांची बदली दुर्गम अशा जालंदर वाडी येथे करण्यात आली. दोन गळक्या वर्गखोल्या आणि ३ पटसंख्या असलेल्या शाळेचे रुपडे त्यांनी अवघ्या एका वर्षामध्ये पालटून टाकले. आज जालंदर नगरं शाळेमध्ये ११० पटसंख्या झाली आहे आणि ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

'जिद्द आणि निश्चय असेल तर आहे त्या चौकटीत राहूनही शिक्षण क्षेत्रात चिरंतन आणि स्थायी बदल करता येतात हे कतृत्वातून सिद्ध केलेल्या वारे गुरुजींना पुरस्कार देताना सावली परिवाराला विशेष आनंद होत आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा सोमवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता सावलीच्या पीरवाडी, राधानगरी रोड, कोल्हापूर येथील प्रांगणात 'सरस्वती कलामंच' या नुतन रंगमंचावर पार पडणार आहे.

हा सत्कार समस्त कोल्हापूरकरांच्या वतीने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव सौ.

शुभांगी गावडे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. तर त्याच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सत्कार समारंभाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ अध्यात्मिक गुरु श्री संजीव कुलकर्णी भुषवणार आहेत. या सत्कार समारंभाच्या आधी मानसशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक श्री शिरिष शितोळे वारे गुरुजींची

प्रगट मुलाखत घेऊन त्यांच्या आजवरचा जीवनप्रवास कोल्हापूरकरांसमोर उलगडून दाखवणार आहेत. तरी आपणांस विनंती की, आपण आपल्या सर्व कुटुंबीय आणि मित्रगणांसोबत या प्रेरणादायी कार्यक्रमास उपस्थित रहावे.

हा पुरस्कार कोल्हापुर प्रेस क्लब, सार्थक कौंडेशन आणि कोल्हापुर पुरोहित संघ यांच्या सहविदयमाने दिला जाणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes