Awaj India
Register
Breaking : bolt
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कधी भरपाई देणार**डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये* *शनिवारी ‘डायबेटिक फूट’वर परिषद*अतिसार थांबवा अभियान’ प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी अमोल येडगे*खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण* :वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडून विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा*वनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा. डॉ. के. प्रथापन* चुये येथे बेंदूर सण उत्साहात साजरावह्याची मदत गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी, आभाळा इतकी; डॉ. राजन गवसव्हनाळी उपसरपंचपदी संजयबाबा घाटगे गटाच्या अश्विनी जांभळे यांची निवडट्रिपलसीट व एकेरी मार्ग उल्लंघनावर दोन लाख रुपयांचा दंड वसूल

जाहिरात

 

रविवारी गुणवंताचा सत्कार

schedule05 Apr 25 person by visibility 515 category

कोल्हापूर
राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. 6) सायंकाळी पाच वाजता जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी कृती फाउंडेशनच्या वतीने विविध गुणवंताचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येत आहे.
यावेळी पुणे येथील अशोक कांबळे, नागाव तालुका करवीर येथील आनंदा कराडे, मुंबईतील पत्रकार आरती कांबळे,नागपूर येथील प्राध्यापक डॉक्टर चंदा वानखेडे, वंदूर तालुका कागल येथील अमर कदम, हसुर तालुका करवीर येथील नामदेव हसुरकर, इस्पुलीॅ तालुका करवीर येथील सागर कांबळे, सिंगणापूर तालुका करवीर येथील प्रा. सचिन धुर्वे, दिंडनेली तालुका करवीर येथील बाळासाहेब कांबळे, विवेकानंद महाविद्यालयाचे प्रा. जितेंद्र भरमगोंडा,  गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजचे प्राध्यापक प्रमोद झावरे वंचित बहुजन आघाडीचे नेते मच्छिंद्र कांबळे, मडिलगे बुद्रुक तालुका भुदरगड येथील डॉ.सुमेध कांबळे, शिवाजी परळीकर, यशवंतराव चव्हाण कॉलेज कोल्हापूर येथील प्रा. भाग्यश्री पाटील चंदूर तालुका हातकणगले येथील प्रकाश कांबळे, घुंगुर तालुका शाहुवाडी येथील अशोक कांबळे यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येत आहे.
प्रोफेसर बसवंत पाटील यांचे महात्मा फुले ते बाबासाहेब आंबेडकर या विषयावर व्याख्यान होणार आहे तर ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत प्रा. डॉक्टर विजय काळेबाग यांचे भारतीय लोकशाही या विषयावर व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी खासदार शाहू छत्रपती असणार आहेत. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ सामाजिक कार्यकर्ते प्रमोद हर्षवर्धन प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes