+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjust गडहिंग्लज एमआयडीसीसाठी प्रयत्नशील राहू adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये* *फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी* adjustमहाराज जरा लक्ष ठेवा, नाहीतर वटमुखत्यार वाड्यावर नाव लावतील adjustचेतन’ यांचे व्हीजन घेऊनच कोल्हापूरचा विकास करणार ; शाहू छत्रपती adjustपोर्ले येथे सभेत सत्यजित पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन adjustगद्दार खासदाराला कायमचे घरी बसवा adjustसतेज पाटील यांच्या सुडाच्या राजकारणाला कंटाळून भाजपप्रवेश ; नेर्लीचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश पुजारी adjustआमच्या विरोधकांनी आता किमान अजिंक्यतारा वरून येणारी स्क्रिप्ट तरी बदलावी adjustविकासकामांच्या आडवे याल तर याद राखा ; कसबा बावड्याचा विकास हेच शिवसेनेचे ध्येय adjustमंडलिक यांनी 27 पैसे तरी कोणाला देऊन माहिती आहेत का?
schedule21 Apr 24 person by visibility 144 categoryराजकीय
विकसित भारताच्या संकल्पासाठी गगनबावड्याची जनता मंडलिकांच्या पाठीशी. 

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पी.जी.शिंदे

गगनबावड्याच्या जनतेचं ठरलयं .. मताधिक्य 
मंडलिकानांच द्यायचं.

तिसंगी ता. २१: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासात्मक अजेंडा घेऊन जागतिक पातळीवर देशाचा लौकिक उंचावला आहे.त्यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार होण्यासाठी गगनबावड्याची जनता मंडलिकांच्या पाठीशी.
राहिल असा ठाम विश्वास के.डी.सी सी.बँकेचे माजी अध्यक्ष आणि गगनबावडा तालुक्याचे नेते पी.जी.शिंदे यांनी व्यक्त केला.

तिसंगी (ता.गगनबावडा) येथे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारात आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते अध्यक्षस्थानी माजी आ.चंद्रदीप नरके होते.

 महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक म्हणाले,"गगनबावडा जरी दुर्गम तालुका असला तरी , विकासाची आस असणारा तालुका आहे. यामुळे आपण या विभागाला भरघोस निधी दिला. पण त्याचे श्रेय भलत्याच लोकांनी घेतले. परंतु या विभागातील जनता स्वाभिमानी आहे. त्यांना सत्य माहिती आहे त्यामुळे ते निश्चितच विकासाच्या बाजूने कौल देतील. आपणही भविष्यात या तालुक्याला प्राधान्यक्रम देऊन तालुक्याचा सर्वांगीण विकास करू."

माजी आ.चंद्रदीप नरके म्हणाले," केंद्र आणि राज्य सरकारने जनता केंद्रबिंदू ठेवून अनेक कल्याणकारी योजना राबवून सामान्य माणसांचा दर्जा उंचावला आहे. मोदींनी जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा उंचावून देशाला एका नव्या उंचीवर ठेवले आहे .विरोधकाच्याकडे फक्त अपप्रचाराचे भांडवल आहे. ते भावनिकतेचा मुद्दा पुढे करून विकासात्मक अजेंडेला बाजूला सारत आहे.परंतु आम्ही विकासाला प्राधान्य देऊन या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलत आहोत त्यास साथ द्या."


 कुंभी बँकेचे अध्यक्ष व गोकुळचे संचालक अजित नरके म्हणाले,"कोल्हापूर जिल्ह्यातही केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून रस्ते , वाहतूक व्यवस्था आरोग्य, आदीसाठी भरघोस निधी आल्याने जिल्ह्यात विकासात्मक कार्याला गती प्राप्त झाली आहे. गगनबावडा तालुक्यातील महायुतीचे सर्व पक्ष एकदिलाने राबून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी संजय मंडलिक यांना पुन्हा एकदा खासदार करण्यात मोलाचा वाटा उचलतील."

मेळाव्यास भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ. आनंद गुरव, संदीप पाटील, जावेद आतार,स्वप्निल शिंदे मेघाराणी जाधव,हंबीरराव पाटील,यांनी मनोगते व्यक्त केली.

 यावेळी एस.आर.पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस आनंद गुरव, भाजप तालुका अध्यक्ष स्वप्निल शिंदे,अल्पसंख्याक माजी तालुकाध्यक्ष जावेद आत्तार,माजी जि.प.सदस्य मेघाराणी जाधव,माजी सभापती एकनाथ शिंदे,
पंचायत समिती माजी सदस्य आनंदा पाटील,शिवसेना तालुकाध्यक्ष तानाजी काटे, महिला तालुकाध्यक्ष राणी विचारे,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, आरपीआय चे तालुकाध्यक्ष तानाजी कांबळे, हंबीरराव पाटील ,सरपंच सर्जेराव पाटील,अनिल पडवळ,सचिन जाधव,दिलीप पाटील, इंद्रजीत मेंगाने
यांच्यासह महायुती चे कार्यकर्ते उपस्थित होते.आभार संजय शिंदे यांनी मानले.