+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये* *फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी* adjustमहाराज जरा लक्ष ठेवा, नाहीतर वटमुखत्यार वाड्यावर नाव लावतील adjustचेतन’ यांचे व्हीजन घेऊनच कोल्हापूरचा विकास करणार ; शाहू छत्रपती adjustपोर्ले येथे सभेत सत्यजित पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन adjustगद्दार खासदाराला कायमचे घरी बसवा adjustसतेज पाटील यांच्या सुडाच्या राजकारणाला कंटाळून भाजपप्रवेश ; नेर्लीचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश पुजारी adjustआमच्या विरोधकांनी आता किमान अजिंक्यतारा वरून येणारी स्क्रिप्ट तरी बदलावी adjustविकासकामांच्या आडवे याल तर याद राखा ; कसबा बावड्याचा विकास हेच शिवसेनेचे ध्येय adjustमंडलिक यांनी 27 पैसे तरी कोणाला देऊन माहिती आहेत का? adjustजनतेला फसवत विश्वासघात, गद्दारी करणाऱ्या संजय मंडलिकांना पराभूत करा
schedule23 Aug 23 person by visibility 153 categoryआरोग्य

कोल्हापूर /प्रतिनिधी : कोल्हापुरातील भूलशास्त्र संघटनेच्या वतीने दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवारी २६ ऑगस्ट आणि रविवारी २७ ऑगस्ट रोजी ही वैद्यकीय परिषद डॉ. डी.वाय पाटील मेडीकल कॉलेज, कसबा बावडा येथे होणार आहे, अशी माहिती भुलतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. शिवाजी जाधव यांनी पत्रकार पत्रकारांशी बोलताना दिली.
    या वैद्यकीय परिषदेमध्ये भूलशास्त्रासंबंधित विविध विषयांवर राष्ट्रीय वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेस महाराष्ट्रासह देशभरातून दोनशेहून अधिक भुलतज्ञ सहभागी होणार आहेत. अशा प्रकारची राष्ट्रीय परिषद घेण्याचा मान हा पहिल्यांदाच कोल्हापूरच्या संघटनेला मिळालेला आहे.तसेच या परिषदेस राष्ट्रीय भुलतज्ञ संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. मनोज कुमार सिन्हा, सचिव डॉ.सुखमिंदर जित सिंग बाजवा, तसेच पदाधिकारी डॉ. मनीषा काटीकर, डॉ.नवीन मल्होत्रा,डॉ. पंकज गुप्ता उपस्थित राहणार आहेत. परिषदेचे उद्घाटन रविवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता होणार आहे. पत्रकार परिषदेस कोल्हापूर भूलतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ.शिवाजी जाधव,
डॉ. संगीता पाटील, सचिव डॉ. पल्लवी कुलकर्णी, डॉ. शितल देसाई,डॉ. सचिन कुंभार आदी उपस्थित होते.