लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मतदार संघाच्या आढावा बैठकीसाठी मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक पार पडली.
schedule10 Jan 24 person by visibility 126 categoryराजकीय
*प्रेस नोट*
यावेळी कोल्हापूर व हातकणंगले मतदार संघा बाबतीतचा अहवाल मांडताना जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी बोलताना दोन्ही मतदार संघ राष्ट्रवादीस मिळावेत अशी मागणी केली. या करिता उमेदवारीबाबत बोलताना सर्वांनी पक्ष संघटना बळकटीसाठी व वाढीसाठी कोल्हापूर मतदार संघासाठी व्ही.बी.पाटील हेच योग्य उमेदवार आहेत असे सर्वानी सुचवले. त्याच बरोबर हातकणंगले मधून प्रतीक पाटील यांचे नाव सुचवले. सर्वांनी सविस्तर म्हणणे मांडल्यानंतर प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी दोन्ही मतदार संघ राष्ट्रवादीस मिळावेत अशी आपली मागणी रास्त आहे. परंतु दोन्ही पैकी एक मतदार संघ पक्षास मिळेल असे सांगितले. त्यापैकी कोल्हापूर मतदारसंघा बाबतीत पक्ष फार सकारात्मक आहे व तो कसा योग्य आहे याची सविस्तर मांडणी केली. त्याकरिता व्ही.बी.पाटील यांच्या उमेदवारीबाबत सर्वांनी आग्रही भूमिका मांडली आहे. त्याबाबत व्ही.बी.पाटील यांच्या नावाचा विचार करू असे आश्वासन दिले. त्याकरिता कोल्हापूर मतदार संघ महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीस मिळणे बाबतीत स्वतः शरद पवार साहेब आग्रहाची भूमिका मांडतील असे देखील बोलताना त्यांनी सांगितले.
यावेळी आ.राजेश टोपे, आ.बाळासाहेब पाटील, आ.एकनाथ खडसे, आ. जितेंद्र आव्हाड, महिला प्रदेशध्यक्ष रोहिणी खडसे, हेमंत टकले, मेहबूब शेख उपस्थित होते. कोल्हापुरातून शहराध्यक्ष आर.के. पोवार, महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी माने, महिला शहराध्यक्ष पद्मा तिवले, राजीव आवळे, रामराजे कुपेकर, अमर चव्हाण, शिवाजीराव खोत, नितीन जांभळे, मदन कारंडे, शिवानंद माळी, मुकुंद देसाई इ. उपस्थित होते.