माध्यमिक शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग म्हणून मुश्ताक शेख यानी पदभार स्विकारला.
schedule02 Oct 21 person by visibility 1041 categoryशैक्षणिक

सिंधुदुर्ग:—प्रतिनिधी (संजय भोसले)
बरेच महीने रिक्त झालेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी हे पद अखेर अधिकृत झाले असून त्या जागी मुश्ताक शेख यानी माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून आपल्या पदाचा कार्यभार नुकताच स्विकिरला आहे.
यापूर्वीचे माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांची बदली झालेने हे पद बरेच महीने रिक्त होते तर पुर्वीचे प्राथमिक शिक्षणाधिकारी .श्री. आंबेरकर यांचे कडे अधिभार सोपवला होता .त्यांचीही बदली झालेने .सिंधुदुर्ग शिक्षण विभागाला कोणी वाली नसल्या सारखे झाले होते.पण अखेर श्री. मुश्ताक शेख यानी या पदाचा पदभार स्विकारल्याने शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
सध्या मुश्ताक शेख यांचेकडे माध्यमिक शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग या पदासह प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणूनही अधिकची जबाबदारी असल्याचे समजते.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्थायी माध्यमिक शिक्षणाधिकारी हे पद मिळाल्याने रखडलेल्या कामांना गती मिळेल व अनेक प्रश्न मार्गी लागतील यामुळे सध्या जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. तसेच अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनांचे पदाधिकारी प्रत्यक्ष जाऊन नव निर्वाचीत शिक्षणाधिकार्यांचे अभिनंदन व स्वागत करत आहेत.
माध्यमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांचे स्वागत करताना कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदिप कदम व इतर जिल्हा पदाधिकारी