+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustजिल्हा परिषदेमार्फत 'गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रम* adjustहिंदू देव देवितांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन adjustहुकुमशाही विषवल्ली तोडून टाकण्यासाठी नारीशक्ती एक व्हा आणि शाहूंना विजयी करा adjustखतीजा शकील मेस्त्री राज्यात पहिली adjustजनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी शाहू महाराजांना निवडून द्या adjustनिगवे येथे शाहू छत्रपतींनी साधला संवाद adjustमाजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी दिला शाहू महाराजांना शब्द adjustदेशात भाजपचा हुकूमशाही कारभार ;सौरभ खेडेकर यांची टीका adjustशाहू छत्रपती यांची रंगपंचमी; संभाजी राजे यांची जूनची हमी adjustगोकुळ’ च्या कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन संघाच्या आणि दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी काम करावे
schedule18 Mar 24 person by visibility 67 categoryआरोग्य
महालक्ष्मी कोहिनूर डायमंड’ व ‘महालक्ष्मी टी.एम.आर.मॅश’ या पशुखाद्याच्या उत्पादनाचा वापर करावा

कोल्हापूर -

पशुखाद्य देणेसाठी गोकुळ नेहमीच कटिबद्ध आहे. म्हणूनच जिल्ह्यात सुमारे ९० ते ९५ % लोक गोकुळचे महालक्ष्मी पशुखाद्य वापरतात. गोकुळ सातत्याने नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याची भूमिका घेत असून दूध उत्पादकांच्या फायद्याचे नवीन उपक्रम राबवत असते गोकुळच्या दूध उत्पादकांच्या मागणीनुसार जातिवंत दुधाळ गाय/ म्हैशीसाठी परिपूर्ण असलेले, उत्तम आरोग्यासाठी तसेच भरघोस दूध आणि चांगल्या प्रतीच्या फॅट साठी बी.आय.एस. टाईप १ चे नवीन प्रीमिअमचे ‘महालक्ष्मी कोहिनूर डायमंड’ या नवीन पशुखाद्याचे उत्पादन सुरु केले आहे.

             हे पशुखाद्य अधिक दूध देणाऱ्या गाय/ म्हैशींसाठी बनविलेले सर्वोत्तम पशुखाद्य असून, या पशुखाद्यामध्ये बायपास फॅट उपयुक्त खाद्याचा परिपूर्ण वापर करण्यात आला आहे .त्याच बरोबर आवश्यक मिनरलस व व्हिटमीन्स, उच्च दर्जाचे तेल, पिंडी, धान्य, खनिज मिश्रणे, खाद्य आदि पुरकांचा यामध्ये समावेश करण्यात आला असल्यामुळे या पशुखाद्यच्या वापरामुळे जनावरांचे दूध उत्पादन चांगल्या प्रकारे वाढणार असून दुय्यम प्रतीची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.तसेच जनावरांचे आरोग्य चांगले राहणार आहे. व्यालेल्या गाय/ म्हैशीसाठी अधिक ऊर्जा मिळणार असून त्या जनावरांचे पहिले सहा महिने अधिक लाभदायक जाण्यास मदत होईल.हे पशुखाद्य गाभण जनावरांकरिता फायदेशीर असून खास करून परराज्यातील आणलेल्या जातिवंत म्हैशींसाठी उपयुक्त आहे .नवीन कोहिनूर डायमंड पशुखाद्य हे आकर्षक ५० किलो बँग मध्ये उपलब्ध आहे.

          तसेच जनावरांना वाळलेल्या वैरणीची कमतरता भासू नये, टी.एम.आर.वीट जनावरांना फोडून खाऊ घालताना महिला दूध उत्पादकांना अडचणी येऊ नयेत, म्हणून संघाने याचा विचार करून नवीन स्वरुपात महालक्ष्मी टी.एम.आर.मॅश हे उत्पादन २५ किलो बँग मध्ये उपलब्ध केले आहे. यामध्ये प्रथिने १० ते ११ टक्के व फॅट १.५ टक्के असून जनावरांची रवंत प्रक्रिया सुधारून दूधवाढ व गुणवत्ता वाढ होण्यास मदत होणार आहे.या बाबतची विस्तृत माहिती दुध संस्थान परिपत्रकाद्वारे कळवली असून जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी आपल्या जनावरांकरिता गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यामध्ये निर्मिती केलेल्या ‘महालक्ष्मी कोहिनूर डायमंड’ व ‘महालक्ष्मी टी.एम.आर.मॅश’ या पशुखाद्याच्या उत्पादनाचा वापर करावा असे आवाहन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले.   

          यावेळी गोकुळचे चेअरमन अरूण डोंगळे, जेष्‍ठ संचालक विश्‍वास पाटील, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बाळासो खाडे, बयाजी शेळके, राजेंद्र मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, व्यवस्थापक पशुखाद्य डॉ.व्ही.डी.पाटील, दूध संस्था प्रतिनिधी, दूध उत्पादक, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.