कोल्हापूर ;
उचगाव (ता. करवीर) येथे गणेशोत्सव आगमनावेळी करण्यात आलेला लेझर शो मूळे दोघेजण जखमी झाले आहेत. एकाच्या डोळ्यातून रक्तस्राव तर एकाचा डोळा सुजलेला आढळून आला आहे.
शनिवारी गणेशाचे आगमन झाले. ढोल ताशासह अनेकांनी डॉल्बी व लेझर शोचे आयोजन केलेले होते. एका तरुण मंडळाच्या स्वागत मिरवणुकीत 27 वर्षाचा तरूण व पोलीस सहभागी झाले होते. तरुणाच्या डोळ्यातून रक्तस्राव झाला असल्यामुळे त्याला ऍडमिट करण्यात आले असे त्याच्या वडिलांनी सांगितले. तर बंदोबस्तात असणारे हवालदार युवराज पाटील हे सुद्धा लेझर शो पासून वाचले नाहीत. त्यांचे डोळे सुजले आहेत.